Surya Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रहांचा राजा सूर्य ग्रह (Surya Gochar) आपली चाल परिवर्तन करणार आहे. सूर्याच्या या बदलत्या परिवर्तनाने अनेक राशींच्या जीवनात नवीन संधी निर्माण होतील. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सूर्य श्रवण नक्षत्रातून निघून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर, सूर्य शनिच्या कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तसेच, 19 फेब्रुवारी रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 

Continues below advertisement

सूर्याचं अशा पद्धतीने वारंवरा नक्षत्र आणि राशी परिवर्तन सामान्य नसणार आहे. याच कारणामुळे फेब्रुवारी महिन्याचा हा काळ करिअर, धनसंपत्ती आणि आत्मविश्वासाशी संबंधित बाबतीत अनेक राशींसाठी खास असणार आहे. या काळात काही राशींच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

फेब्रुवारीत सूर्याची बदलती चाल मेष राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे. यामुळे तुमच्या कामाला चांगली गती मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं कौतुक केलं जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल. तुम्हाला नोकरीत तुमच्या मनाप्रमाणे पोस्ट मिळेल. तसेच, तुमची निर्णयक्षमता चांगली दिसून येईल. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. 

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

सूर्य ग्रहाच्या संक्रमणाचा प्रभाव वृषभ राशीवर दिसून येणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळेल. नवीन योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, मित्रांचा देखील तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी चांगली नोकरी लवकर चालून येईल. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. या काळात हा महिना तुमच्यासाठी फार खास आणि शुभकारक असणाप आहे. या काळात तुमच्यासाठी प्रगतीची अनेक दारं खुली होतील. तुमच्यातील आत्मविश्वास चांगला दिसून येईल. तसेच, आरोग्याच्या तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. झोप पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नात्यात चांगली स्थिरता दिसून येईल. तुमच्यातील नेतृत्वक्षमता चांगली दिसून येईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप काही शिकवणारा असणार आहे. या काळात तुमच्या मुलांची नेतृत्वक्षमता चांगली दिसून येईल. नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. तसेच, तुमच्या नात्यातील गैरसमज आपसूक दूर होतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

फेब्रुवारीत होणाऱ्या सूर्याच्या संक्रमणाने धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. तसेच, तुमच्यातील नेतृत्वक्षमता चांगली दिसून येईल. भावा-बहिणीच्या नात्यात चांगले संबंध निर्माण झालेले दिसतील. तसेच, तुमची महत्त्वाची कामे वेळेत पार पडतील. अनेक महत्त्वाच्या योजना तुम्ही राबवाल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Mahashivratri 2026 : भगवान शंकराच्या हातात डमरु का असतो? जाणून घ्या त्रिशूळ, वाघाचे कातडे, भस्म आणि सर्प यामागचं रहस्य...