Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याला नवग्रहांचा राजा म्हणतात. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतात. या दरम्यान सूर्याची कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती होते. 15 जून रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य ग्रह ट्रिपल राजयोग निर्माण करणार आहे.
मिथुन राशीत आधीपासूनच गुरु आणि बुध ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे या तीन ग्रहांच्या युतीने त्रिग्रही, बुधादित्य आणि गुरु आदित्य योग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रह 15 जून रोजी सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर, 16 जुलैपर्यंत सूर्य याच राशीत स्थित असणार आहे. या ठिकाणी आदित्य योग 16 जुलैपर्यंत असणार आहे. हा संयोग तब्बल 12 वर्षांनंतर जुळून येणार आहे. त्याचबरोबर मिथुन राशीत बुधादित्य योग 22 जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
या राशीच्या लग्न चरणात सू्य ग्रह ट्रिपल राजयोग निर्माण करणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, नोकरीत अनेक संधी निर्माण होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामे लवकर सुटतील. समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. तसेच, लवकरच तुम्हाला शुभवार्चा मिळू शकते.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी ट्रिपल राजयोग फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या नवव्या चरणात गुरु, बुध आणि सूर्य ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
