Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य (Surya Gochar 2025) एका ठराविक कालावधीनंतर राशी संक्रमण करतात. सूर्य ग्रहाला मान-सन्मान, सुख समृद्धी, आणि धनसंपदेचा कारक ग्रह मानतात. प्रत्येक महिन्याला सूर्य आपल्या राशीत बदल करतात. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. सध्या सूर्य ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान आहे. हा अत्यंत बलशाली ग्रह आहे. मात्र, 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या राशीत आल्याने सूर्याचं बळ कमी होणार आहे. यामुळे अनेक राशींना सकारात्मक परिणाम मिळतील. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याला पितासमान मानलं जातं. 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 1 वाजून 54 मिनिटांनी सूर्य कन्या राशीत संक्रमण करणार आहे. तर, 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत याच राशीत स्थित असणार आहेत.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचं राशी परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या सहाव्या चरणात सूर्याचं संक्रमण होणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये स्थिरता टिकून राहील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल. नोकरीत स्थिरता टिकून राहील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमचं आरोग्य चांगलं राहील. तसेच, मुलांच्या देखील कलागुणांना चांगला वाव मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचं कन्या राशीत होणारा प्रवेश फार शुभकारक ठरणार आहे. तसेच, या राशीच्या सूर्य दहाव्या स्थानी आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातून तुम्हाला समाधान मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण लाभदायक ठरणार आहे. सूर्य या राशीच्या धन आणि वाणीवर प्रभाव करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ मिळेल. तसेच, नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, तुमची वाणी प्रभावशाली असेल. तुमच्या वाणीमुळे लोक प्रभावित होतील. व्यवसायातील लोकांना धनलाभाचे चांगले योग जुळून येणार आहेत. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)