Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सिंह राशीचा स्वामी ग्रह अर्थात सूर्य (Sun) एका ठराविक अंतराने एका राशीतून (Zodiac Signs) दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. सध्या सूर्य कन्या राशीत विराजमान आहे. 17 ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून मार्गक्रमण करुन तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 


ग्रहांचा राजा सूर्याने तूळ राशीत प्रवेश करताच सूर्य नीच स्तरावर होणार आहे. सूर्याच्या तूळ राशीत संक्रमण करताच याचा परिणाम मानवी जीवनावरही होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, तूळ राशीच्या नीच स्थानी सूर्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. सूर्याचं तूळ राशीत संक्रमण मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा परिणाम करेल ते जाणून घेऊयात. 


सूर्याचा तूळ राशीत संक्रमण करताच 12 राशींवर 'असा' होणार प्रभाव 


मेष रास - सूर्याच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांची नोकरीत चांगली स्थिती राहणार आहे. या राशीच्या लोकांचा प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. 


वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण काहीसं नकारात्मक प्रभाव टाकणारं असेल. 


मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांच्या रागात वाढ होण्याची शक्यता आहे. 


कर्क रास - कर्क राशीच्या लोकांनी गृह कलेशापासून थोडं दूरच राहावं. 


सिंह रास - सिंह राशीच्या लोकांमध्ये कमी उत्साह दिसून येईल. 


कन्या रास - कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. लवकरच गोड बातमी मिळेल. 


तूळ रास - तूळ राशीच्या लोकांची संक्रमणामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. 


वृश्चिक रास - या राशीच्या लोकांच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 


धनु रास - धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. 


मकर रास - या राशीच्या लोकांचा व्यवसाय चांगला चालेल. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळेल. 


कुंभ रास - या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. 


मीन रास - सूर्याचं राशी संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी फार अशुभ असणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 15 नोव्हेंबरपर्यंत शनीची वक्री चाल; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू; नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार