Surya Gochar 2024 : काही दिवसांतच सूर्य (Sun) ग्रहाचं सिंह राशीत संक्रमण होणार आहे. सिंह राशीचा स्वामी हा सूर्य ग्रह आहे. अशातच ग्रहांचा राजा असलेला सूर्य ग्रहाचं आपल्या स्वराशीत संक्रमण फार शुभकाराक मानले जात आहे. 16 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत संक्रमण करणार आहे. सूर्याच्या शुभ प्रभावाने काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशीच्या लोकांचं प्रमोशन होऊन तुमच्या मान-सन्मानात देखील वाढ होणार आहे. तर, 365 दिवसांनंतर सूर्याचं संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


सूर्याचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा होईल.तसेच, तुमच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी हळुहळु कमी होताना दिसतील. तुम्ही तुमच्या प्रतिभेने सर्व समस्यांचा अगदी सहजतेने सामना करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या अडचणी कमी होतील. तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मानसन्मान मिळेल. तुम्हाला तुमच्या पालकांकडून किंवा गुरुंकडून चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढत जाईल. कुटुंबात चांगली सुख-शांती नांदेल. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्या. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीत सूर्याचं संक्रमण  या राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक मानलं जाणार आहे. या दरम्यान संपूर्ण महिनाभर तुम्ही खूप आत्मविश्वासू फील कराल. तसेच, तुमचा फोकस तुमच्या कामावर असेल. कामावरून सर्वत्र तुमच्या कामाचं कौतुक देखील केलं जाईल. या काळात जोडीदाराबरोबरचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Vastu Tips For Mirror : उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...