Surya Gochar 2024 On Makar Sankranti: सूर्याने आपला पुत्र शनि याच्या मकर राशीत प्रवेश केला आहे आणि सूर्याचं हे मार्गक्रमण सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणारं आहे, असं मानलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल, त्यांच्यासाठी हे मार्गक्रमण खूप शुभ ठरेल. मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींवर (Zodiac Signs) मकर संक्रांतीचा काय परिणाम होईल? पाहूया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांना सूर्याच्या मार्गक्रमणामुळे यश मिळेल. तुमच्या करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगलं कामाचं वातावरण लाभेल. नोकरदारांना चांगल्या संधी मिळू शकतात, या काळात तुम्हाला परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगलं यश मिळू शकेल.
वृषभ रास (Taurus)
सूर्य मकर राशीत असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना फायदा होईल. प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील आणि करिअरच्या दृष्टीनेही फायदा होईल. हे संक्रमण तुमच्यासाठी खूप भाग्याचं मानलं जातं. परदेशातही जे व्यवसाय करतात त्यांना फायदा होईल. नशीब तुमच्या पाठीशी असेल. व्यावसायिकांना गुंतवणुकीत नफा मिळेल. तुमची कौटुंबिक परिस्थितीही चांगली असेल, तुमचे जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचं मार्गक्रमण फारसं शुभ मानलं जात नाही. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांना अधिक नफा मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या बजेटची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतही काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तुमच्या दोघांमध्ये काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनी यावेळी त्यांच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करण्याची आणि चांगली योजना आखण्याची आवश्यकता जाणवेल. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात तुमचा तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. संयम बाळगा आणि तुमच्या जोडीदाराशी उद्धटपणे बोलू नका. पाय दुखणे आणि सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो, आरोग्याची काळजी घ्या.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांना सूर्याच्या मार्गक्रमणामुळे नवीन यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल आणि व्यावसायिक भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. नोकरदार लोकांना त्यांच्या प्रयत्नातून यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत अपेक्षित लाभ मिळणार नाही. हा काळ तुमच्यासाठी सामान्य असेल. तुमचं कौटुंबिक जीवन थोडं गोंधळाचं असणार आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत तणावपूर्ण परिस्थिती राहील. तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्यावर जास्त पैसे खर्च करावे लागतील.
तूळ रास (Libra)
सूर्याच्या मार्गक्रमणाचे परिणाम तुमच्यासाठी फारसे शुभ नाहीत. तुम्हाला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा दडपून टाकाव्या लागतील. पैशाच्या बाबतीत, या काळात तुम्हाला जास्त परतावा मिळणार नाही आणि तुम्हाला अधिक समस्यांना सामोरं जावं लागेल. सर्व कामं अत्यंत काळजीपूर्वक करावी लागतील.
वृश्चिक रास (Scorpio)
सूर्याच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल. या काळात तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळेल. तुमचे भाऊ आणि बहिणी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो, हा प्रवास तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचं चांगलं जमेल, तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
धनु रास (Sagittarius)
सूर्य संक्रमणाच्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि तुमच्या पैशाशी संबंधित सर्व योजना यशस्वी होतील. तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्या कुटुंबात आनंद वाढेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. व्यवसायात नफा वाढेल आणि तुमची रणनीती यशस्वी होईल. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं मधुर असेल आणि परस्पर संबंध अधिक चांगले राहतील. उत्पन्न वाढेल.
मकर रास (Capricorn)
सूर्याचं मार्गक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी तितकं शुभ राहणार नाही. तुम्हाला प्रगतीमध्ये अडथळ्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. तथापि, या काळात तुम्हाला अचानक लाभही मिळू शकतो. नोकरदार आणि व्यावसायिकांना व्यवसायात अनपेक्षित परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध अनुकूल असतील आणि तुम्हाला व्यवसायात यश मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना सूर्य मार्गक्रमणाच्या अशुभ प्रभावांना सामोरं जावं लागू शकतं आणि तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात. कठोर परिश्रम करूनही यश मिळवणं तुम्हाला कठीण जाईल. कामावर तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे वाद होऊ शकतात आणि तुमच्या मनात निराशेची भावना निर्माण होईल. जोडीदाराशी समन्वय नसल्यामुळे तुमच्या आयुष्यात तणाव वाढू शकतो. वादविवाद टाळा.
मीन रास (Pisces)
सूर्याच्या या संक्रमणादरम्यान, मीन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात आणि व्यवसायातही अपेक्षित नफा मिळू शकतो. तुम्हाला प्रमोशनही मिळेल. या काळात अनेक गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं घट्ट होईल आणि नात्यात प्रेम वाढेल. आत्मविश्वास वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: