Surya Chandra Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहाची युती होणार आहे. नुकतंच 17 ऑगस्ट रोजी सूर्याने (Surya Gochar) सिंह राशीत प्रवेश केला. या राशीत 17 ऑक्टोबरपर्यंत सूर्य स्थित असणार आहे. तर, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजून 16 मिनिटांनी सूर्य देव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी 25 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजून 28 मिनिटांपर्यंत असणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, आत्मसन्मान, त्वचा, आत्मविश्वासाचा दाता सूर्य ग्रह मन, मानसिक स्थिती, विचार आणि स्वभावाचा दाता चंद्र ग्रहाबरोबर युथी अनेक राशींसाठी शुभ असणार आहे. सूर्य-चंद्राची युती तीन राशींसाठी फार लकी ठरणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
23 सप्टेंबर 2025 रोजी जुळून येणारी सूर्य-चंद्र युती सिंह राशीसाठी फार शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक संकटातून सुटका होईल. या व्यतिरिक्त तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद लवकर मिटतील. नात्यातील कटुता दूर होईल. तसेच, तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण राहील. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल.
तूळ रास (Libra Horoscope)
सूर्य-चंद्राची युती तूळ राशीसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नातेवाईकांबरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांना या काळात शुभवार्ता मिळू शकते. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी फार उत्तम असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
सिंह आणि तूळ राशीच्या लोकांव्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या युतीचा लाभ मीन राशीच्या लोकांना देखील मिळणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-सुविधांत वाढ झालेली दिसेल. तुमच्या घरात शांतीचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. एकूणच तुमची सगळी कामे मार्गी लागतील. नोकरदार वर्गातील लोकांना देखील कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची संधी निर्माण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :