Surya Chandra Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, दिवाळीच्या आधी आणि दिवाळीनंतर तीन राशींना (Zodiac Signs)  चांगला लाभ मिळणार आहे. कारण या काळात सूर्य (Sun) आणि चंद्राची (Moon) लवकरच युती होणार आहे.


हिंदू ज्योतिष शास्त्रानुसार यंदा 20 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी सूर्य तूळ राशीत संक्रमण करणार आहे. तर, 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी चंद्रसुद्धा तूळ राशीत संक्रमण करणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत चंद्र याच राशीत स्थित असणार आहे.


सूर्य आणि चंद्र ग्रहाची युती 2025


सूर्य आणि चंद्राच्या युतीने तीन राशींना अनेक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तसेच, तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. तुमचं व्यक्तिमत्व चारचौघांत उठून दिसेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडण्याची शक्यता आहे.


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य-चंद्राची युती लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. शत्रूवर तुमची करडी नजर असणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट झालेली दिसेल. तसेच, या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात.


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा काळ फार आनंदाचा असणार आहे. या राशीत सूर्य आणि चंद्राची युती होणार असल्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल. या काळात घरातून बाहेरपडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्य-चंद्राची युती शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ पाहायल मिळेल. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार वाढलेला दिसेल. मित्रांशी भेटीगाठी होतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.


हेही वाचा :          


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Baba Venga : 2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; आर्थिक स्थिती उंचावणार, बाबा वेंगांचं भाकित



Car loan Information:

Calculate Car Loan EMI