Sun Transit 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याचं (Lord Sun) राशी परिवर्तन फार प्रभावशाली मानलं जातं. 15 मे 2026 रोजी सूर्य देव मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे हे संक्रमण शनिश्चरी अमावस्येच्या ठीक एक दिवस आधी होणार आहे. यामुळे अनेक राशींवर शुभ परिणाम होतील. सूर्याचं हे राशीत परिवर्तन मेष, कर्कसह 6 राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या दुसऱ्या चरणात सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली बरकत पाहायला मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी नोकरीचे नवीन प्रस्ताव येतील. तसेच, पैशांच्या गुंतवणुकीसाठी हा काळ फार योग्य ठरणार आहे. तुम्ही ठरवलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी अमावस्येचा हा काळ लाभदायी ठरेल. या कालावधीत तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तसेच, या कालावधीत जुन्या वादविवादांपासून तुमची सुटका होईल.
सिंह रास (Leo Horoscope)
या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. तो दहाव्या चरणात असल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये अनेक नवीन बदल घडून येतील. सामाजिक पद-प्रतिष्ठा तुमची वाढेल. तसेच, मित्रांचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात लांबचा प्रवास करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. मात्र, हा प्रवास सुखाचा असेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना शनिश्चरी अमावस्येच्या काळात नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. तसेच, जर तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ योग्य आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी हा कालावधी लाभदायी असणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा लाभ घेता येईल. प्रॉपर्टीशी संबंधित तुमचे वाद मिटतील. तसेच, तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
