Somvati Amavasya 2024 : येत्या सोमवारी म्हणजेच 8 एप्रिल रोजी सोमवती अमावस्या (Somvati Amavasya) आहे. या अमावस्येला भगवान शंकराची पूजा केली जाते. त्याचबरोबर सोमवती अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात. जीवनात प्रगती होते. जर तुम्हाला पितृ दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
- तुमच्या आयुष्यात कधीही पशु-पक्ष्यांना छळू नका. असहाय व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो. विशेष म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रा, कावळा, गाय, म्हैस यांसारख्या जीवांचा अपमान करू नये.अमावस्येला पशु-पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करा. असे केल्याने पितृ प्रसन्न होतात.
- सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा. यामुळे सुद्धा तुमचे पितृ दोष दूर होतील तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुमच्या जीवनात प्रगतीही होईल. तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता.
- सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने, सिंदूर, शंख, सिंदूर, नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे.
- सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा. यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्यांचा रागही निघून जातो.
- हिंदू धर्मात पिंड दान फार महत्वाचे मानले जाते. जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंड दान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंड दान करावे. याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :