Monday remedies In Marathi : सोमवारचा दिवस हा भगवान शंकराला समर्पित आहे, म्हणून या दिवशी संपूर्ण शिव परिवाराची विधीपूर्वक पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवारी (Monday) पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र बलवान असतो. जर तुमच्या कुंडलीत चंद्र बलवान असेल तर घरात आनंदाचे आगमन होते. ज्योतिष शास्त्रामध्ये सोमवारसाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.


त्याचबरोबर या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात, जीवन आनंदी होते. शंकर देवाची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. सोमवारी केलेले निश्चित उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या संपवू शकतात. यासाठी सोमवारचे उपाय (Monday Remedies) जाणून घेऊया.


सोमवारचे उपाय


1. जर तुमच्या घरात नेहमी भांडण आणि आपसी वादाची परिस्थिती असेल तर सोमवारी स्नान केल्यानंतर भगवान शंकराचे ध्यान आणि पूजा करा. मग शीशम वृक्षासमोर हात जोडून तुमच्या घरात सुख-शांती राहो अशी कामना करा. सोमवारी हा उपाय केल्याने घरातील कलह दूर होतात आणि सुख-शांती कायम राहते.


2. तुमच्या वैवाहिक जीवनात नेहमी वादाची स्थिती असेल तर सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राक्ष दान करा. असे केल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहते. यासोबतच तुम्हाला आर्थिक संकटातूनही दिलासा मिळेल. 


3. जर तुम्हाला नेहमी महादेवाच्या आशीर्वादाचे पात्र बनायचे असेल तर सोमवारी स्नान केल्यानंतर मंदिरात जाऊन शिवलिंगाचा विधीपूर्वक अभिषेक करा. धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी हा उपाय केल्याने भोले शंकर तुमच्यावर खूप प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. 


4. जर तुमच्या कुंडलीत अशुभ ग्रह राहत असतील तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी मंदिरात जाऊन तांब्याच्या भांड्यात गंगाजल आणि काळे तीळ टाकून भोलेनाथांना अभिषेक करा. मान्यतेनुसार, असे केल्याने तुमच्या कुंडलीतून शनि दोष दूर होतो.


शंकराची पूजा करण्यासाठी सोमवारचा दिवस शुभ मानला जातो. कर्जापासून मुक्ती आणि सुख-समृद्धी मिळवायची असेल तर सोमवारी तुम्ही हे निश्चित उपाय करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Rahu Transit : नवीन वर्षात मायावी ग्रह राहू करणार मीन राशीत भ्रमण; 'या' 3 राशींच्या संपत्तीत होणार वाढ, मिळणार अपार लाभ