Somavati Amavasya 2026 : यंदाची सोमवती अमावस्या 14 की 15 जूनला? अमावस्येच्या दिवशी नेमकं काय करावं? वाचा शुभ तिथी आणि वेळ आणि महत्त्व
Somavati Amavasya 2026 : सोमवती अमावस्या समवार 15 जून 2026 रोजी आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा, पूर्वजांना प्रार्थना, पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

Somavati Amavasya 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्याने पुण्य फळ मिळते असं म्हणतात. जेव्हा ही अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यंदाची सोमवती अमावस्या अधिक मासात आल्यामुळे तिला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
सोमवती अमावस्या समवार 15 जून 2026 रोजी आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा, पूर्वजांना प्रार्थना, पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
अधिक मास अमावस्या तिथीची शुभ वेळ कोणती?
सोमवती अमावस्या तिथी प्रारंभ 14 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजून 19 मिनिटांनी होणार आहे. तर, अमावस्या तिथीची समाप्ती 15 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजून 23 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार, सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाईल. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने, तिचे धार्मिक महत्त्व वाढते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव आणि विष्णूची पूजा करणे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे, तर्पण करणे आणि दान करणे यामुळे विशेष पुण्य मिळते.
अधिक मासाच्या दिवशी काय करावं?
- सोमवती अमावस्या आणि अधिक मास अमावस्या एकाच दिवशी असल्या कारणाने तुम्ही या दिवशी पवित्र नदीत स्नान करु शकता. गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करा.
- या दिवशी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करावी.
- पितरांसाठी प्रार्थना आणि तर्पण करावे.
- पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करुन प्रदक्षिणा घालावी.
- आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे.
ज्येष्ठ सोमवती अमावस्येची तिथी...
ज्योतिषींच्या माहितीनुसार, ज्येष्ठ अधिक मासाची अमावस्या 14 जून रोजी दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि 15 जून रोजी सकाळी 8:24 वाजता संपेल.
सोमवती अमावस्येचे महत्त्व
सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करण्याची आणि भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो. तसेच, वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा येत नाहीअसं म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील देवघरात किंवा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला पाणी, चंदनाचा लेप आणि बेलपत्र अर्पण करावे. तसेच, भगवान शंकराला खीर अर्पण करावी. यामुळे पुण्य फळ मिळते अशी मान्यता आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Shubh Yog 11 June 2026 : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृश्चिकसह 5 राशींना मिळणार शुभ फळ, धनसंपत्तीत भरभराट



















