सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा नव्याने उभारणीच्या कामाला वेग; चौथऱ्याचा पाया खोदला, 'या' बड्या शिल्पकारावर जबाबदारी

Statue of Shivaji Maharaj : सिंधुदुर्गात 60 फूट पुतळा नव्याने साकारण्यात येणार आहे, ज्याचं काम वेगाने सुरू झालं आहे. तर एका मोठ्या शिल्पकारावर संपूर्ण पुतळा उभारणीच्या कामाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

Continues below advertisement

सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात 60 फूट पुतळा नव्याने साकारण्यात येणार आहे, ज्याचं काम वेगाने सुरू झालं आहे. सध्या राजकोट किल्ल्यावर खोदकाम सुरू आहे. तर एका मोठ्या शिल्पकारावर संपूर्ण पुतळा उभारणीच्या कामाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

Continues below advertisement

या शिल्पकारावर संपूर्ण पुतळा उभारणीच्या कामाची जबाबदारी

राज्य सरकारने या ठिकाणी 60 फूट उंच पुतळा उभारण्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिलं आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं काम पाहिलं होतं. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभरण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे.

3 मीटर उंचीचा मजबूत चौथरा बांधला जाणार

राजकोट किल्ल्यावर सध्या 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनवण्याच्या कामाला सूरुवात झाली आहे. या चौथऱ्यावरच शिवरायांचा 60  फूट उंच पुतळा उभा असेल. राज्य शासनाने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर निविदांची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे.

पुतळ्याच्या बांधकामासाठी अटी

राजकोट किल्ल्यावर कांस्य धातूपासून 60 फूट उंचीचा 8 मी.मी. जाडीचा शिवरायांचा पुतळा तयार होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची 60 फूट इतकी असणार आहे. तर पुतळा ज्यावर उभा असेल तो 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनवण्यात येणार आहे. निविदेनुसार 100 वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर 10 वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे.

हेही वाचा:

Saphala Ekadashi 2024 : यंदाची सफला एकादशी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले                                                                                                                           

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola