Shukraditya Rajyog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये सूर्य ग्रहाला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्य ग्रहाला पिता, मान-सन्मान, आत्म्याचा कारक ग्रह मानतात. अशातच सूर्याच्या स्थितीत होणारा बदल 12 राशींवर परिणाम करणारा आहे. सध्या सूर्य मीन राशीत शनि, मंगळ ग्रहासह विराजमान आहे.
14 एप्रिल रोजी सूर्य ग्रह राशी परिवर्तन करुन उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनाने शुक्र ग्रहाबरोबर युती होणार आहे. त्यामुळे सूर्य आणि शुक्र ग्रहाच्या युतीने शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, 3 राशींसाठी हा काळ लकी ठरणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, सूर्य ग्रह 14 एप्रिल 2026 रोजी मंगळवारी 9 वाजून 38 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य ग्रह 15 मे पर्यंत असणार आहे. या दरम्यान सूर्याच्या शुक्र ग्रहाबरोबर युती 26 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यानंतर शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
शुक्र आणि सूर्य ग्रहाच्या युतीने शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. हा मेष राशीसाठी लाभदायी ठरेल. या कालावधीत तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, या राशीच्या लग्न भावात हा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा योग भाग्याचा ठरणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ असणार आहे. सूर्याच्या अकराव्या प्रवेश केल्याने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल.
सिंह रास (Leo Horoscope)
या राशीच्या नवव्या चरणात सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल, तसेच, या कालावधीत तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. नवीन कार्याची सुरुवात करण्यास तुम्ही सक्षम असाल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या दरम्यान पूर्ण करु शकता.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
