Continues below advertisement

Shukra Transit 2025 : ज्योतिष शास्त्रात शुक्र (Venus) ग्रहाला वैभव, ऐश्वर्य, धन-संपत्ती, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानण्यात आला आहे. त्यामुळेच जेव्हा शुक्र ग्रहाच्या चालीत परिवर्तन होतं तेव्हा याचा काही खास क्षेत्रावर परिणाम होतो. शुक्र ग्रह डिसेंबर महिन्यात धनु राशीत संक्रमण करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर पडणार आहे. मात्र, या दरम्यान 3 राशींचं भाग्य उजळणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Horoscope)

शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन धनु राशीसाठी फार शुभकारक ठरणार आहे. शुक्र ग्रह या राशीच्या कुंडलीतील नवव्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येऊ शकतात. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, या काळात यात्रेचे देखील शुभ योग जुळून येणार आहेत. सरकारच्या नवीन योजनांमध्ये तुम्ही पैशांची गुंतवणूक करु शकता.

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन फार अनुकूल ठरणार आहे. शुक्र ग्रह या राशीच्या कुंडलीत प्रथम स्थानी संक्रमण करतायत. त्यामुळे तुमच्या कार्यात चांगली प्रगती दिसून येईल. या कालावधीत तुमची वैवाहिक स्थितीदेखील चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा वाहन, प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.

मीन रास (Pisces Horoscope)

शुक्र ग्रहाचं संक्रमण मीन राशीसाठी फार भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमच्या कामाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या हातात एखादी मोठी डील लागू शकते. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांचं कामात प्रमोशन होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                

Shukra and Shani Yuti : तब्बल 30 वर्षांनंतर अद्भूत योगायोग! शनि-शुक्राच्या युतीने नवीन वर्षात 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, धनलाभाचे मिळतील संकेत