Shukra Transit 2025: मेष.. तूळसह 'या' 3 राशींनी 2 नोव्हेंबरपर्यंत सावध राहा! शुक्राचा नीचभंग योग नुकसान करणार, तर 'या' राशी होणार मालामाल
Shukra Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 2 नोव्हेंबरपर्यंत 'या' 3 राशींना खूप कठीण काळाचा सामना करावा लागेल, ग्रहांचे योग आर्थिक नुकसान, त्रास, अपघाताची शक्यता दर्शवित आहेत.

Shukra Transit 2025: ऑक्टोबर (October 2025) महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर नोव्हेंबर (November 2025) महिना येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), 2025 वर्षातील अकरावा महिना हा ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीच्या दृष्टीकोनातून अत्यंत खास आहे. या महिन्यात अनेक राशी मालामाल होण्याचे संकेत आहेत. तर 3 राशींना कठीण काळाचा सामना करावा लागणार असल्याची भीती आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना नुकसान होणार? कोणत्या राशी मालामाल होणार?
2 नोव्हेंबरपर्यंत 'या' 3 राशींनी सावध राहा! (Neechbhang yog 2025)
ज्योतिषशास्त्रानुसार, संपत्ती, समृद्धी आणि विलासासाठी जबाबदार असलेला शुक्र ग्रह सध्या कन्या राशीत आहे. शुक्र कन्या राशीत त्याच्या सर्वात खालच्या स्थानावर आहे आणि नीचभंग राजयोग बनवत आहे, ज्यामुळे अशुभ परिणाम मिळतात. ही परिस्थिती अनेक लोकांसाठी अत्यंत वेदनादायक ठरू शकते. सुख आणि समृद्धी देणारा ग्रह शुक्र 9 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत गेला. आता, 2 नोव्हेंबरपर्यंत शुक्र कन्या राशीत राहील, ज्यामुळे नीचभंग योग निर्माण होईल. ज्यामुळे तीन राशींना खूप कठीण काळाचा सामना करावा लागेल ज्योतिषशास्त्रानुसार, 2 नोव्हेंबरपर्यंत मेष....तूळसह 3 राशींना आव्हानांचा सामना करावा लागेल, ग्रहांचे योग आर्थिक नुकसान, त्रास, अपघाताची शक्यता दर्शवित आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी? ज्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र राशीच्या संक्रमणामुळे मेष राशींना खूप त्रास होईल. या काळात, विरोधक तुम्हाला त्रास देतील. शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. तुमचे आरोग्य बिघडू शकते. काळजीपूर्वक वाहन चालवा.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीवर शुक्राचे राज्य आहे आणि त्याचे भ्रमण या लोकांसाठी संभाव्य नुकसान निर्माण करत आहे. अनावश्यक खर्च होतील. एका चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार, या वेळी मीन राशीसाठी आर्थिक अडचणी येऊ शकतात. आजार किंवा दुखापत तुम्हाला त्रास देऊ शकते. काळजीपूर्वक वाहन चालवा. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
'या' राशी होतील मालामाल..
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र कन्या राशीत गेल्याने 4 राशींना धन-वैभव, सुख-समृद्धी मिळेल. मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या राशी 2 नोव्हेंबरपर्यंत समृद्धीचा अनुभव घेतील. तीन राशींसाठी ते खूप कठीण असेल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: ऑक्टोबरचा चौथा आठवडा भाग्याचा की टेन्शनचा? दिवाळीचा सण 12 राशींसाठी कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















