Shukra Rahu Dhan Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारी (February 2026) महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. हा महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खास मानला जाणार आहे. या महिन्यात मंगळ (Mars) ग्रह आपल्या मकर राशीत राहून रुचक राजयोग (Rajyog) निर्माण करणार आहे. तिथे शुक्र ग्रहाच्या स्थितीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. शुक्र ग्रहाला ज्योतिष शास्त्रात धन, ऐश्वर्य, सुख-समृद्धी आणि आकर्षणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे शुक्र ग्रहाची जेव्हा चाल बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या आर्थिक जीवनावर पडतो. 

Continues below advertisement

द्रिक पंचांगानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला 6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत राहू ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि राहूच्या युतीने एक शक्तिशाली धन योग निर्माण होणार आहे. या योगाचा सर्व राशींवर परिणाम पाहायला मिळेल. मात्र, तीन राशींसाठी हा काळ फार भाग्यशाली असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

पंचांगानुसार, शुक्र ग्रह 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 1 वाजून 15 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी राहूसह शुक्राची युती 2 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि राहूमुळे जुळून येणारा धन योग अनेक पद्धतीने लाभदायी ठरणार आहे. या योगामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, पैसा कमावण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. या राशीवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. मात्र, या काळात तुमची चांगली कमाई होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा योग शुभकारक ठरणार आहे. या कालावधीत तुमच्या भौतिक सुख संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल.  तसेच, नवीन बिझनेसची सुरुवात करु शकता. स्टार्टअप सुरु करण्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी फेब्रुवारीचा महिना फार खास असणार आहे. या काळात शुक्र आणि राहूच्या युतीमुळे लग्न भावाचा योग जुळून येणार आहे.तसेच, तुम्हाला नशिबाची देखील चांगली साथ मिळेल. घरात आनंदाचं वातावरण राहील. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीचा देखील तुम्ही चांगला लाभ घ्याल. या कालावधीत नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ काळ आहे. 

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

February 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी फेब्रुवारी महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; 'या' राशींना लागणार लॉटरी, मासिक राशीभविष्य