Shukra Gochar 2026 : अवघ्या दोन दिवसांत कर्क राशीत शुक्राचं संक्रमण; शुभ राजयोगामुळे 8 जूनपासून 3 राशींचं भाग्य उजळणार, हातात खेळेल पैसा
Shukra Gochar 2026 : ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हे संक्रमण फार महत्त्वाचं असणार आहे. कारण कर्क राशीत देवगुरु बृहस्पती आधीपासूनच विराजमान आहे.

Shukra Gochar 2026 : द्रिक पंचांगानुसार, येत्या 8 जून 2026 रोजी सुख-समृद्धी, सौंदर्याचा कारक शुक्र (Shukra Gochar) ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत संक्रमण करणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हे संक्रमण फार महत्त्वाचं असणार आहे. कारण कर्क राशीत देवगुरु बृहस्पती आधीपासूनच विराजमान आहे. कर्क राशीत शुक्र आणि गुरु ग्रहांच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. हा काळ कोणकोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) लाभदायी असेल ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
शुक्र ग्रहाचं संक्रमण कर्क राशीच्या पहिल्या चरणात होणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसून येतील. समाजकार्यात तुमचा हातभार लागेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या बाराव्या चरणात गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. या संक्रमणाने तुम्हाला चांगला लाभ मिळेल. उत्पन्नाची नवीन साधनं तुमच्यासमोर निर्माण होतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. तुमच्या व्यवसायाचा देखील विस्तार वाढलेला दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
शुक्र ग्रहाचं हे संक्रमण कन्या राशीच्या अकराव्या चरणात होणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट झालेली दिसेल. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये अचानक मोठा बदल दिसून येईल. तसेच, तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू लागतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांची चक्रावणारी भविष्यवाणी! जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मिथुन, कर्कसह 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट, लवकरच लागणार जॅकपॉट



















