Shukra Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानतात. शुक्र ग्रह लवकरच राहूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. येत्या 20 मे 2026 रोजी बुधवारी रात्री 12 वाजून 37 मिनिटांनी आर्द्र नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात 31 मे 2026 पर्यंत शुक्राचं संक्रमण होणार आहे. या दरम्यान 4 राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला आत्मचिंतनाची गरज भासणार नाही. तुम्हाला तुमचे निर्णय ठामपणे घेता येतील. तसेच, अनेक उत्पन्नाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. मानसिक तणाव कमी होईल. तसेच, जर तुम्हाला या काळात एखादं वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शुक्र ग्रहाचं हे संक्रमण मिथुन राशीसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या प्रेमजीवनात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, नोकरीत तुमच्यासाठी प्रमोशनच्या संधी उपलब्ध असतील. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे नवीन प्रस्ताव येतील. व्यवसायिक लोकांच्या हातात चांगली डील मिळू शकते. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी सुखकर असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
शुक्र ग्रहाचं संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला अनेक कामे सहज पूर्ण करता येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. सहकाऱ्यांचा देखील चांगला सपोर्ट मिळेल. या कालावधीत तुम्ही अनेक नवीन कार्याची सुरुवात करु शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
शुक्राच्या आर्द्र नक्षत्रात प्रवेश केल्याने तूळ राशींसाठी हा काळ फलदायी असणार आहे. या काळात प्रवासाचे अनेक शुभ योग जुळून येतील. तसेच, तुमच्या सौदर्यांत आणखी चांगली भर पडेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तसेच, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. फक्त तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
