Shukra Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाची चाल थोड्या अंतराने बदलते. याचा प्रभाव देशभरात पाहायला मिळतो. तसेच, येत्या 6 फेब्रुवारी 2026 रोजी धनसंपत्ती आणि वैभवाचा दाता शुक्र ग्रह (Shukra Gochar) आपल्या मित्र राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. या काळात शुक्र ग्रह आपल्या राशीच्या प्रथम चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल दिसून येईल. त्याचबरोबर तुमच्या आत्मविश्वासात देखील चांगली वाढ झालेली असेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. तसेच, पार्टनरचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. जोडीदाराबरोबर तुमची प्रगती होऊ शकते. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शुक्र ग्रहाचं संक्रमण वृषभ राशीसाठी लाभदायी ठरेल. कारण शुक्राचं आधिपत्य या राशीवर आहे. त्यामुळे तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगले बदल घडून येतील. प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुख-समृद्धीचा लाभ घ्याल. तसेच, आई-वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

Continues below advertisement

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा वृश्चिक राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख संपत्तीत चांगला लाभ मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्यातील नातेसंबंध चांगले राहतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. याचा लाभ तुम्हाला भविष्यात मिळेल. या काळात तुम्हाला जर नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. 

हे ही वाचा :                                                                                                              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीचा उपवास करताय! जाणून घ्या पूजेचे नियम आणि योग्य विधी...