Shukra Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, धनसंपत्ती, वैभव आणि सुखाचा कारक दाता शुक्र ग्रह (Shukra Gochar)लवकरच राशी संक्रमण करणार आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि देव आहे. या राशीत राहू आधीपासूनच विराजमान आहे. या व्यतिरिक्त ग्रहांचा राजकुमार बुध सुद्धा विराजमान आहे. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीत राहू-शुक्र ग्रहाची युती काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. या दरम्यान अनेक लाभ मिळतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

आर्थिक ध्येय गाठण्याकडे तुमचं लक्ष असेल. तसेच, या प्रवासात अनेक शुभ योग जुळून येतील. या कालावधीत तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता. तसेच, कोणताही व्यवहार करताना सामंजस्याने करा. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

या कालावधीत मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. तसेच, प्रवासाचे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. नात्यात सकारात्मकता दिसून येईल. तुमच्या कामात चांगली प्रगती दिसून येईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी हा काळ शुभकारक असणार आहे. या कालावधीत उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. अनेक नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना धनसंपत्तीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. तसेच, जुन्या सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुम्ही यश संपादन कराल. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. या काळात तुम्ही शुभ कार्याची सुरुवात करु शकता. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शुक्र ग्रहाचं संक्रमण याच राशीत होणार आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. पैशांशी संबंधित व्यवहार तुम्ही जपून कराल. तसेच, नवीन सरकारी योजनांचा लाभ घ्याल. 

हे ही वाचा :                           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 5 February 2026 : आजचा दिवस 7 राशींसाठी धोक्याचा, फक्त 4 राशींवर असणार दत्तगुरुंची कृपा, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य