Shukra Gochar 2025 : अवघ्या 24 तासांतच 'या' 4 राशींसाठी उघडणार संपत्तीचा खजिना; शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मालामाल होतील राशी
Shukra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला शुभ ग्रह मानतात. त्यामुळे शुक्र ग्रह जेव्हाही आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा अनेक राशींना चांगला लाभ मिळतो.

Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह शुक्र (Venus) हा ठराविक अंतराने आपली चाल बदलतात. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र देव आता पुन्हा आपली चाल बदलणार आहेत. यंदा शुक्र नक्षत्र परिवर्तन करणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला शुभ ग्रह मानतात. त्यामुळे शुक्र ग्रह जेव्हाही आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा अनेक राशींना चांगला लाभ मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह 20 जुलै 2025 रोजी मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने चार राशींना चांगला आर्थिक लाभ मिळेल या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. या काळात तुम्ही काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खेरदी करु शकता.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन विशेष लाभदायी ठरणार आहे. तसेच, या दरम्या तुमच्या घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. पार्टनरबरोबर चांगला संवाद साधाल. तसेच, उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. सुख-संपत्तीचा चांगला लाभ घ्याल. कलागुणांना प्रोत्साहन द्याल.
तूळ रास (Libra Horoscope)
शुक्र ग्रह हा तूळ राशीचा देखील स्वामी ग्रह आहे. त्यामुळे शुक्राच्या नक्षत्र परिवर्तानाने तूळ राशींना देखील लाभ मिळेल. या काळात तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं फार
मकर रास (Capricorn Horoscope)
शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन मकर राशीसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. समाजातील अनेक दिग्गज लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















