Shukra Gochar 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 20 जुलै 2025 चा दिवस आहे. आजच्या दिवशी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. त्यानुसार आज दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी मृगशिरा नक्षत्रात शुक्राचं (Shukra Gochar) परिवर्तन होणार आहे. मृगशिरा नक्षत्राचा स्वामी मंगळ ग्रह आहे. त्यामुळे शुक्राने या नक्षत्रात प्रवेश करताच काही राशींवर संकट ओढावण्याची शक्यता आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिथुन राशीसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरु शकतो. या काळात तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्हाला अनेक संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील बॉसकडून तुमच्या कामाची तक्रार होऊ शकते. व्यापारी वर्गातील लोकांना विचारपूर्वक पैसा गुंतवावा लागेल. तसेच, नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल. तसेच, मनातील इच्छा या काळात व्यक्त करु नका. कोणावर विनाकारण चिडचिड करु नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन तूळ राशीसाठी फार अशुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या कामात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. तसेच, काही लोकांना आर्थिक तंगीचा देखील सामना करावा लागू शकतो. कोणतीही नवीन जोखीम हाती घेऊ नका. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु नये. तसेच, तुमच्या मनातील विचार, भावना फक्त जवळच्याच व्यक्तींशी शेअर करा. या काळात तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कारण यामुळे अनेक लोक नकळतपणे दुखावू शकतात. गैरसमज बाळगू नका. तसेच, दूरच्या व्यक्तीशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करु नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                              

Lucky Zodiac Signs : 20 जुलैच्या दिवशी 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नशिबाचे दरवाजे उघडणार, नवीन नोकरीची संधी?