Shukra Gochar 2025 : शुक्राच्या संक्रमणामुळे निर्माण होणार 'गजलक्ष्मी योग'; 28 जुलैपासून 'या' 5 राशींची होणार चांदीच चांदी, पैशांचा पडणार धो-धो पाऊस
Shukra Gochar 2025 : शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे गजलक्ष्मी योग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 28 जुलै पासून शुक्र ग्रहाचे (Shukra Gochar) मिथुन राशीत संक्रमण होणार आहे. या संक्रमणामुळे गजलक्ष्मी योग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. हा योग संपत्ती, सौंदर्य, ऐश्वर्य, कला, आणि आकर्षण यांचा संगम घडवतो. विशेषतः शुक्र ग्रह मिथुन राशीत आल्यावर वैचारिक स्पष्टता, संवाद कौशल्य, आणि नातेसंबंधात गोडवा वाढवतो. गजलक्ष्मी योग निर्माण झाल्याने कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे. याच संदर्भात अधिक माहिती डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिली आहे.
गजलक्ष्मी योगाचे परिणाम :
गजलक्ष्मी योगामुळे खालील गोष्टींमध्ये वाढ होते :
आर्थिक लाभ
व्यवसाय/नोकरीत प्रगती
सौंदर्य, अभिरुची व आकर्षणात वाढ
स्त्री वर्गाला विशेष लाभ
प्रेमसंबंधात यश
कला, फॅशन, मीडिया क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा
कोणत्या राशींना विशेष फायदा होईल?
1. वृषभ रास (Taurus Horoscope)
शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असून मिथुन हे त्याच्या दुसऱ्या स्थानात येते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत शुभ. नवीन स्त्रोतांद्वारे उत्पन्न वाढेल.
2. मिथुन रास (Gemini Horoscope)
स्वराशीतील शुक्र ग्रहामुळे गोड बोलणं, आकर्षण, आणि संबंध सुधारतील. व्यवसाय आणि नातेसंबंधात भरभराट होण्याची शक्यता आहे.
3. कन्या रास (Virgo Horoscope)
शुक्र दशम स्थानात जात असल्यामुळे करियरमध्ये मोठ्या संधी मिळतील. उच्च पद किंवा प्रमोशनचा योग लवकरच जुळून येणार आहे.
4. तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीचा स्वामी शुक्रच असल्याने गजलक्ष्मी योग तूळ राशीसाठी अत्यंत शुभ असणार आहे. धार्मिक प्रवास, भाग्योदय, परदेशी संधी निर्माण होऊ शकतात.
5. कुंभ रास (Aquarius Horoscope)
शुक्र पंचम स्थानात असल्याने प्रेमप्रकरणात यश, सर्जनशील क्षेत्रातील प्रगती, आणि नवा आत्मविश्वास मिळेल.
कोणाला काळजी घ्यावी लागेल?
कर्क, वृश्चिक, मीन राशींनी आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे.
प्रेमसंबंधात गैरसमज टाळावेत.
उपाय (सर्व राशींसाठी शुभ परिणाम वाढवण्यासाठी) :
शुक्रवारच्या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करा.
श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टकम् चे पठण करा.
सफेद गोड पदार्थ वाटा.
माता लक्ष्मी आणि शुक्रदेवाची पूजा करा.
- डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :




















