Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तनासह नक्षत्र परिवर्तन देखील करतात. याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होतो. माहितीसाठी, 12 मार्च 2025 रोजी शुक्र (Shukra) शतभिषा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू (Rahu) ग्रहाला मानलं जाते. तसेच, राहू आणि शुक्र यांच्या मैत्री भाव आहे. त्यामुळे राहूच्या नक्षत्रात होणारं हे परिवर्तन काही राशींच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशींच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला ठराविक वेळेनुसार धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात विविध मार्गांतून तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, जे लोक विवाहित आहेत त्यांच्यासाठी येणारा काळ चांगला असणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुमचा चांगला ताळमेळ जुळलेला दिसेल. या काळात तुम्ही तुमच्या मेहनतीवर लक्ष देऊन पुढे जाण्याची गरज आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन फार अनुकूल ठरणार आहे. हा काळ नोकरदार वर्गातील लोकांसाठी फार शुभ असणार आहे. तसेच, जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला काही काळ थांबावं लागेल. धार्मिक कार्यात तुमची चांगली रुची वाढलेली दिसेल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही लवकरच एखद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फार व्यस्ततेचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर्स मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: