Shukra Ast 2024 : शुक्र (Shukra) हा ग्रह सर्व ग्रहांमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह हा आनंद, विलास आणि ऐश्वर्य यांचा कारक आहे. नुकताच शुक्र ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. पण, इतर राशींसाठी मात्र, शुक्राची स्थिती चांगली राहणार नाही. या संक्रमणामुळे अनेक नात्यात चढ-उतार येतील. शुक्र मेष राशीत नकारात्मक स्थितीत असल्यामुळे कोणत्या राशींचे संबंध बिघडू शकतात ते जाणून घेऊयात. 


मेष रास 


शुक्र ग्रह सध्या मेष राशीत स्थित आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्वात नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागेल. या लोकांना कामापासून नोकरीपर्यंत नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. शुक्राची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही.


तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि तुमच्या नातेसंबंधात समाधान मिळणार नाही. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या जोडीदाराशी वारंवार वाद होण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला या राशीला देण्यात आला आहे. 


वृषभ रास 


वृषभ राशीच्या लोकांना वरिष्ठांशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, तुम्ही जे काही काम कराल त्यात अडथळे येतील. तुम्हाला सहकाऱ्यांच्या समस्यांनाही सामोरे जावे लागेल. व्यवसायात लाभ मिळणार नाही.


आर्थिक अडचणीत राहाल. तुमचे आरोग्य बिघडू शकते. मानसिक अस्वस्थता राहील. तुमच्या वैयक्तिक इच्छा तुमच्या नात्यात तणाव निर्माण करू शकतात. जोडीदाराशी दुरावा वाढू शकतो. त्यामुळे मेष राशीत शुक्र अस्त करताना विशेष काळजी घ्या.


सिंह रास 


शुक्र मेष राशीत असताना यश मिळण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. जोडीदाराशी मतभेदही वाढू शकतात. वैवाहिक जीवनात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. 


विवाहित लोकांचे त्यांच्या जोडीदारासोबतचे संबंध बिघडू शकतात. प्रेम प्रकरणात अपयशाला सामोरे जावे लागेल. विवाहित लोकांना एकमेकांच्या भावनिक गरजांची काळजी घ्यावी लागेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Budh Graha 2024 : बुध ग्रहाचं मीन राशीत संक्रमण! मिथुनसह 'या' 3 राशींचे सुरु होणार 'अच्छे दिन'; शिक्षण, नोकरीत प्रगतीच्या अनेक संधी होतील उपलब्ध