Shubh Yog 27 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 27 एप्रिलचा (April 2026) दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. तसेच, आजच्या दिवशी मीन राशीतून मेष राशीत चंद्राचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी धन योग आणि गजकेसरी योग जुळून आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. तसेच, चंद्र, सूर्य आणि शुक्राच्या युतीने त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा कोणत्या 5 राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे तुमचा दिवस उत्साहात जाईल. तसेच, दिवसाच्या सुरुवातीला तुमची स्थिती फार अनुकूल असेल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये चांगली सुरुवात झालेली दिसेल. तसेच, उत्पन्नाचे अनेक साधनं तुमच्यासमोर खुले होतील. वाहन खरेदी करण्यासाठी शुभ दिन आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणारआहे. या राशीच्या अकराव्या चरणात चंद्राने संक्रमण केलं आहे. तसेच, तुम्ही जे काम करताय त्यातून तुम्हाला समाधान मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, घरातील वातावरण फार आनंदी असणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आज अनेक गोष्टी शिकायला मिळतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, आज तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. सामाजिक कार्यात तुमचं मोलाचं योगदान लाभेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. आर्थिक स्थितीत चांगली भरभराटच दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला असेल. मनासारख्या गोष्टी तुम्हाला करता येतील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या हातातील कामे आज वेळेवर पूर्ण होतील. नवीन गोष्टी शिकाल. धार्मिक यात्रेत सहभागी होण्याचे योग जुळून येणार आहेत. दिवसाची सुरुवात उत्साही होईल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 27 April 2026 : आज सोमवारच्या दिवशी 8 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य