Shravan Month 2025 Wishes In Marathi : हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे, श्रावण (Shravan) महिन्याला फार महत्व आहे. शिवभक्तीसाठी असलेला हा श्रावण महिना उद्यापासून म्हणजेच 25 जुलै 2025 पासून सुरु होतोय. श्रावणात अनेक सण-समारंभ असतात. तसेच, अनेक उपवास, व्रत-वैकल्ये केली जातात. एक प्रकारे पवित्र असा हा महिना मानला जातो. याच निमित्ताने तुम्ही देखील तुमच्या मित्र-मंडळींना, नातेवाईकांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

श्रावण मासारंभ शुभेच्छा संदेश 2025 (Shravan 2025 Wishes In Marathi)

आनंद माझ्या मनात माईना,सृष्टी सजली बदलली दृष्टीघेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणीश्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग रंगात रंगला श्रावणनभ नभात उतरला श्रावणपानापानात लपला श्रावणफुलाफुलांत उमलला श्रावणश्रावण महिन्याच्या मन भरून शुभेच्छा!

श्रावण मासाला झाला प्रारंभकरू शिवाच्या पूजेला आरंभठेऊ शिवाचे व्रत होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्णश्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाकाल नावाची किल्लीउघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,होतील सर्व कामे पूर्ण तुमचीश्री शिव शंकराची हीच महती,ओम नम: शिवायश्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! 

परंपरेचे करूया जतनआला आहे श्रावण...श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्याआला तो श्रावण पुन्हा आला…श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!  

निसर्ग आलाय बहरून,मनही आलंय मोहरून,रंगात तुझ्या नहाण्या,मन होई पाखरू पाखरूश्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सणासुदीची घेऊन उधळणआला रे आला हसरा श्रावण!श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!  

 

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहेशिव अनंत, शिव ब्रम्ह आहेशिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्तीश्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा!  

चाहूल तुझी लागताच येते मन बहरूनअशा या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!

कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवणकरून ठेवतो कायमची साठवणअसा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हे ही वाचा :                                                                               

Shravan 2025 : आला आला श्रावण आला! मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमेसह जाणून घ्या महत्त्वाच्या दिवसांची यादी