Hindu Religion : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांनी सुरु होणार आहे. श्रावण (Shravan 2026) महिना हा भगवान शंकर आणि त्यांच्यावर असलेल्या भक्तीचा सर्वात पवित्र काळ मानला जातो. श्रावणात प्रत्येकजण भगवान शंकराच्या आराधनेत, हर-हर महादेवाचा जयघोष करत तल्लीन असतो. असं म्हणतात या पवित्र काळात जे भक्त खऱ्या भावनेने शंकराची पूजा करतात भोलेनाथ त्यांचे सर्व दु:ख दूर करतात.
हिंदू परंपरेत भगवान शंकर हे फक्त देवतांचेच नाही, तर ऋषि, राजा, असुर, पशु- पक्षी आणि साधारण मनुष्याचेदेखील आराध्य दैवत होते. शंकराच्या भक्तित ना काही भेदभाव आहे ना कुठल्या भावाची आवश्यकता आहे. शंकराची भक्ती केवळ भाव आणि समर्पणाचा मोल आहे. या ठिकाणी आपण महादेवाच्या आठ सर्वात महान आणि परम भक्तांविषयी जाणून घेऊयात.
भक्त कन्नप्पा
दक्षिण भारतातल्या एका शिकारी कुळात जन्मलेले कन्नप्पा शिवभक्तीचे सर्वोच्च प्रतीक मानले जातात. पौराणिक कथेनुसार,जेव्हा कन्नप्पा यांनी शिवलिंगाच्या एका डोळ्यातून रक्ताची धार लागलेली पाहिली, तेव्हा कन्नप्पांनी मागे पुढे न पाहता स्वत:चा डोळा काढून शिवलिंगावर लावला. मग दुसर्या डोळ्यातून पण रक्त वाहू लागलं. तर, त्यांनी दुसरा डोळा पण दान करण्यासाठी पायाचा अंगठा शिवलिंगावर ठेवला जेणेकरुन डोळा योग्य ठिकाणी लागेल.त्यांच्या या भक्तीला पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी भक्ताची दृष्टी परत केली.
लंकापती रावण
रावणाचा जरी आपल्या अहंकारामुळे विनाश झाला. पण तो भगवान शंकराच्या सर्वात मोठ्या भक्तांपैकी एक होता. रावणाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली. आणि आपलं मस्तक शंकराच्या चरणी अर्पित केलं. रावणाने अत्यंत मधुर आणि ओजस्वी शिव तांडव स्त्रोताची रचना केली. यावर प्रसन्न होऊन महादेवाने रावणाला चंद्रहास खड्ग आणि अक्षय शक्तीचं वरदान दिलं.
महर्षि मार्कंडेय
ऋषी मार्कंडेय यांचं वय केवळ 16 वर्ष होतं. पण, त्यांच्या भक्तीने काळाला देखील मागे टाकून अधिक सक्षम केलं. जेव्हा यमराज त्यांचे प्राण घेण्यास आले तेव्हा बालक मार्कंडेय शिवलिंगाला बिलगले. आणि महामृत्यूंजय मंत्राचा त्यांनी जाप केला. त्यावेळी स्वत: महादेवांनी प्रकट होऊन यमराजपासून मार्कंडेयाच्या प्राणांची रक्षा केली आणि त्यांना अमरता म्हणजेच चिरंजीवी होण्याचं वरदान दिलं.
बाणासूर
दैत्यराज बळीचा पुत्र बाणासूर हा भगवान शंकराचा भक्त होता. बाणासुराने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सहस्त्र भुजांनी तांडव नृत्य करताना विविध वाद्ययंत्र वाजवले होते. त्यांच्या या अद्भूत कला आणि भक्तीला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी स्वत: त्यांच्या शहराची रक्षा करण्याचं वचन दिलं.
नंदी
ऋषि शिलाद यांचे पुत्र नंदी हे फक्त भगवान शंकराचे वाहन नव्हते. तर, त्यांना सर्वात प्रिय गण आणि भक्त देखील मानण्यात आलं आहे. नंदीच्या अल्पायुचा योग टाळण्यासाठी घोर तपस्या करुन महादेवांना प्रसन्न केले होते. महादेवांनी त्यांना अजर अमर होण्याचं वरदान दिलं. आणि आपल्या गणांचा अधिपती म्हणजेच मुख्य द्वारपाल तसेच, वाहन म्हणून स्वीकार केला.
भगवान श्री राम
भगवान विष्णुच्या अवतारांपैकीच एक म्हणजेच भगवान श्री रामसुद्धा महादेवांचे परम भक्त होते. लंकेत जाण्याआधी सर्वात आधी प्रभू श्रीरामांनी समुद्राच्या किनारी वाळूने शिवलिंग निर्माण केला होता. त्याची विधीवत पूजा केली होती. ज्याला रामेश्वरम ज्योतिर्लिंगाच्या नावाने देखील ओळखलं जातं.
कुबेर देव
धनेश्वर कुबेर देव पूर्वजन्मात गुणनिधी नावाचे एक साधारण व्यक्ती होते. जे नकळतपणे शिवपूजेशी जोडले गेले होते. कठीण तपस्या आणि शिव चरणात समर्पणामुळे महादेवांनी त्यांनी समस्त ब्रह्मांडाच्या धनसंपदेचा स्वामी बनवलं.
उपमन्यु
ऋषि धौर्माच्या शिष्याची बालभक्ती शिव पुराणात अत्यंत प्रसिद्ध आहे. दुधाची इच्छा ठेवणारे बालक उपमन्युला जेव्हा त्यांच्या आईने तांदळाच्या पिठाचं पाणी दिलं तेव्हा त्यांनी खऱ्या दुधासाठी भगवान शंकराची कठोर तपस्या सुरु केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना क्षीरसागर भेट म्हणून दिला होता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
