Shravan 2026: श्रावण महिना... हिंदू धर्मातील अत्यंत खास महिना...श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात शिवभक्त उपवास, रुद्राभिषेक, शिवपूजा आणि “ॐ नमः शिवाय” जप करतात. श्रावण महिना धार्मिक सणांनीही समृद्ध असतो. नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमीसारखे सण देखील याच काळात येतात. त्यामुळे हा महिना भक्ती, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचा मानला जातो. पंचांगानुसार याच श्रावण महिन्यात 2026 वर्षातील शेवटची 2 ग्रहणं देखील होणार आहेत, श्रावण महिन्यातील ही ग्रहणे अनेक प्रकारे विशेष असतील. श्रावण महिना कधी सुरू होतोय? भाग्यशाली राशी, ग्रहणांची तारीख, वेळ, महत्त्व, सर्व माहिती जाणून घ्या

Continues below advertisement

कधी सुरू होतोय श्रावण महिना? (Shravan 2026)

हिंदू पंचांगानुसार तसेच मराठी दिनदर्शिकेनुसार, 2026 मध्ये श्रावण महिना हा साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या मध्यात सुरू होऊन सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. महाराष्ट्रात अमावस्या पद्धतीनुसार श्रावण मास हा 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होऊन 10 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. तसेच या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण देखील याच श्रावण महिन्यात होणार आहेत. ही ग्रहणे श्रावण महिन्यातील अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी होतील. धार्मिक श्रद्धेनुसार, श्रावण महिन्यातील ही ग्रहणे अनेक प्रकारे विशेष असतील. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणांच्या तारखा, वेळ, भाग्यशाली राशींबद्दल.. जाणून घ्या.

श्रावण महिन्यातील भाग्यशाली राशी...(Shravan 2026 Lucky Zodiac Signs)

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिन्यात मेष राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात लाभदायक ठरू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि आत्मविश्वास वाढेल.

Continues below advertisement

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी हा श्रावण महिना प्रतिष्ठा आणि प्रगती घेऊन येणार आहे. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात फायदा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रेमजीवनातही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या व्यक्तींना श्रावण महिन्यात मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन गुंतवणुकीतून फायदा होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. आरोग्यही चांगले राहण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी श्रावण महिना सकारात्मक बदल घेऊन येईल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि मानसिक समाधान मिळेल.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशींसाठी हा महिना भाग्यवृद्धीचा मानला जात आहे. प्रवासातून लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मन अधिक रमू शकते.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीसाठी श्रावण महिना शुभ संकेत देणारा ठरेल. घरात शुभकार्याचे योग आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता आणि समाधान अनुभवायला मिळेल.

श्रावण महिन्यात 2 ग्रहण होणार...

पंचांगानुसार, या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण श्रावण महिन्यात होणार आहेत. भगवान शिवाच्या पवित्र महिन्यात होणारी ही ग्रहणे अनेक प्रकारे विशेष मानली जातात. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून या ग्रहणांना विशेष महत्त्व दिले जाते. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून, राहू हा चंद्र आणि सूर्याला ग्रहण लावतो. ग्रहणांना वैज्ञानिक दृष्ट्याही महत्त्व आहे. ही ग्रहणे श्रावण महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी होतील. पौर्णिमा आणि अमावस्या हे दिवस दानधर्म आणि पूजेसाठी विशेष मानले जातात. पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी अमावस्येच्या दिवशी होईल. तर चंद्रग्रहण 28 ऑगस्ट रोजी पौर्णिमेच्या दिवशी होईल.

ग्रहण किती वाजता लागणार?

ज्योतिषींच्या मते, श्रावण महिन्यात दोन ग्रहणे होणार आहेत. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि दुसरे चंद्रग्रहण होईल. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत. 12 ऑगस्ट रोजी, सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 8:04 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 1:07 वाजता संपेल. चंद्रग्रहण 28 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 8:04 वाजता सुरू होईल आणि सकाळी 11:22 वाजता संपेल.

श्रावण महिना इतका विशेष का आहे?

श्रावण महिन्याला पौराणिक महत्त्व आहे. याच पवित्र महिन्यात भगवान शिवाने देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते. भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी देवी पार्वतीने 108 वर्षे पूजा आणि नामजप केला. 108 वर्षांनंतर, श्रावण महिन्यातच भगवान शिवाने देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. म्हणूनच, हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे. त्यामुळे, या महिन्यात भगवान शिवाची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

हेही वाचा

June 2026 Monthly Horoscope: काऊंटडाऊन सुरू! जून महिना पॉवरफुल, 6 राशींची लॉटरी, नवीन ऑफर्स! ग्रहांचे शुभ संकेत, मेष ते मीन मासिक राशीभविष्य...

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)