Shravan 2025 : श्रावणात 'या' 5 राशींवर बरसणार बाबा भोलेनाथांची कृपा; संकटातून मुक्त करतील महादेव, आर्थिक स्थिती सुधारेल?
Shravan 2025 Lucky Zodiac Signs : यंदा 25 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यानुसार, श्रावणात कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात.

Shravan 2025 Lucky Zodiac Signs : हिंदू धर्मशास्त्रानुसार, श्रावण (Shravan 2025) हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण या महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. तसेच, भगवान शंकराची आराधना केली जाते. श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना मानला जातो. या दरम्यान प्रत्येक श्रावणी सोमवाराचं विशेष महत्त्व आहे. यंदा 25 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यानुसार, श्रावणात कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना फार शुभकारक ठरणार आहे. या राशीच्या लोकांवर बाबा भोलेनाथांची विशेष कृपा असणार आहे. तसेच, या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी श्रावण महिना आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा असणार आहे. या दरम्यान तुमच्यासाठी अनेक नवीन संधी निर्माण होतील. तसेच, तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती झालेली दिसेल. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. मनात सकारात्मकता जाणवेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे. या काळात ग्रहांची शुभ दृष्टी तुमच्यावर असणार आहे. तसेच, तुमच्या जीवनात स्थिरता टिकून राहील. परदेशात जाण्याची संधी निर्माण होईल. तसेच, तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमच्या कामची प्रशंसा केली जाईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे. या काळात तुम्ही ज्या योजना आखाल त्या पूर्ण होऊ शकतील. तसेच, तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली असेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी श्रावण महिना उत्साहाचा असणार आहे. या राशीवर भगवान शंकराची विशेष कृपा असणार आहे. भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल. वैवाहिक जीवनात स्थिरता राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य



















