Shravan 2025 : हिंदू पंचांगानुसार, आज आषाढ अमावस्येचा दिवस (Ashadh Amavasya). उद्यापासून श्रावण (Shravan) मासारंभाला सुरुवात होणार आहे. श्रावणाला अत्यंत पवित्र महिना मानतात. कारण या महिन्यात अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. या दिवसांत श्रावणी सोमवार, मंगळागौरी पूजनापासून ते गोपाळकालापर्यंत अनेक सण अत्यंत गुण्या-गोविंदाने साजरे केले जातात. त्यामुळेच हा सर्वांचा प्रिय महिना देखील मानला जातो.
यंदा 25 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यानुसार या श्रावणात कोणकोणते महत्त्वाचे सण येणार आहेत. तसेच, त्यांचं महत्त्व नेमकं काय आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या दिवसांची यादी 2025 (Shravan Mass 2025 List)
25 जुलै 2025 - श्रावण मासारंभ
29 जुलै 2025 - नागपंचमी
8 ऑगस्ट 2025 - नारळी पौर्णिमा
9 ऑगस्ट 2025 - रक्षाबंधन
12 ऑगस्ट 2025 - अंगारक संकष्ट चतुर्थी
14 ऑगस्ट 2025 - पतेती
15 ऑगस्ट 2025 - जन्माष्टमी
16 ऑगस्ट 2025 - गोपाळकाला
श्रावण सोमवार व्रत
मंगळा गौरी व्रत
22 ऑगस्ट 2025 - पोळा
मंगळागौरी पूजन
श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते.
विनायक चतुर्थी
हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळलं जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
