Shravan 2025 : श्रावणी शिवरात्रीला जुळून येतायत तब्बल 3 शुभ राजयोग; 'या' राशींवर असणार भगवान शंकराचा आशीर्वाद, मिळणार बंपर लाभ
Shravan 2025 : श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवार असतील. एक श्रावण शिवरात्री येणार आहे. या दरम्यान अनेक शुभ राजयोग जुळून येतील.

Shravan 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, येत्या 25 जुलै 2025 पासून श्रावण (Shravan) महिन्याला सुरुवात होणार आहे. तर, 23 ऑगस्ट 2025 ऑगस्टला श्रावणमास संपणार आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. भगवान शंकरासाठी या महिन्यात उपवास केले जातात. या काळात चार श्रावणी सोमवार असतील. एक श्रावण शिवरात्री येणार आहे. या दरम्यान अनेक शुभ राजयोग जुळून येतील ते कोणते हे खास ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिलेल्या माहितीतून जाणून घेऊयात.
या वेळी अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत :
मालव्य, गजकेसरी आणि नवपंचम राजयोग श्रावण शिवरात्रीच्या दिवशी बनत आहेत.
हे योग 24 वर्षांनी प्रथमच पुन्हा तयार होत आहेत. याआधी 2001 मध्ये हे झाले होते.
यामध्ये शुक्र वृषभ राशीत असल्यामुळे मालव्य योग होईल.
सूर्य आणि बुध यांच्या युतीने बुधादित्य योग तयार होईल.
चंद्र आणि गुरू युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल.
सूर्य व अरुण (Uranus) 110 अंशांवर असतील, ज्यामुळे नवपंचम राजयोग होईल.
हे सर्व योग शुभ फलदायी, धन-प्राप्ति, सुख-संपत्ती, राजमान्यतेचे सूचक आहेत.
2. राशींवरील संभाव्य परिणाम :
कर्क, वृषभ, मिथुन या राशींवर या योगांचा विशेष प्रभाव पडू शकतो.
या योगामुळे :
आर्थिक वाढ, नवीन संधी, उच्च पद मिळणे शक्य आहे.
बुद्धी तेजस्वी होईल, निर्णयक्षमता वाढेल.
गुप्त चिंता दूर होतील आणि मनशांती लाभेल.
विशेषत: ज्या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि भगवान शिवाची कृपा असेल, त्यांना अत्यंत सकारात्मक लाभ होऊ शकतो.
3. उपाय आणि श्रावण शिवरात्रीचे महत्त्व :
श्रावण शिवरात्री ही भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते.
या दिवशी केलेल्या उपवास, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप, बेलपत्र अर्पण, दुग्धाभिषेक यांचा मोठा प्रभाव असतो.
शिव मंत्र जसे की:
“ॐ नमः शिवाय”,
“महामृत्युंजय मंत्र”,
यांचे 118 किंवा 108 वेळा जप करावा.
विशेष उपाय :
- काळसर वस्त्र परिधान करा, पांढऱ्या फुलांनी पूजन करा.
- संध्याकाळी शिवलिंगावर साखर, मध, बेलपत्र आणि पाणी अर्पण करा.
- दूधात केशर टाकून शिव अभिषेक केल्यास आयुष्यमान व धनलाभ होतो.
- उपवास करून रात्री शिवमहिम्न स्तोत्र किंवा रुद्राष्टक पाठ करावा.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :




















