Shravan 2025 : श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच येतोय महाशक्तिशाली 'अंगारकी योग'; सर्व 12 राशींवर कसा होणार परिणाम? वाचा ज्योतिषशास्त्र
Shravan 2025 : यंदाचा अंगारकी योग श्रावण महिन्यात असल्यामुळे त्याचे प्रभाव अत्यंत शक्तिशाली असणार आहेत. खाली याचे संपूर्ण विश्लेषण दिले आहे.

Shravan 2025 : हिंदू पंचांगानुसार, श्रावण (Shravan) महिना लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक शुभ-अशुभ ग्रह निर्माण होणार आहेत. श्रावण महिन्यात 21 वर्षांनी बनणारा अंगारकी योग अत्यंत शुभ मानला जातो. विशेषतः धार्मिक कार्य, शिव उपासना आणि कर्जमुक्तीसाठी हा योग फार शुभ मानला जातो. यंदाचा अंगारकी योग श्रावण महिन्यात असल्यामुळे त्याचे प्रभाव अत्यंत शक्तिशाली असणार आहेत. खाली याचे संपूर्ण विश्लेषण दिले आहे. याचीच सविस्तर माहिती ज्योतिष शास्त्रज्ञ डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिली आहे.
अंगारकी योग म्हणजे काय?
अंगारकी योग तेव्हा बनतो जेव्हा मंगळवार (मंगळ ग्रहाचा दिवस) चतुर्थी तिथीला येतो. जर ही श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी असेल, तर ती अत्यंत दुर्लभ आणि शक्तिशाली योग मानली जाते. श्री गणपती आणि भगवान शिव यांची विशेष कृपा या दिवशी मिळते.
श्रावण महिन्यातील अंगारकी योगाचे सर्व 12 राशींवर परिणाम
मेष रास
कर्जमुक्ती, कोर्ट केसेस मध्ये यश, आरोग्यात सुधारणा
वृषभ रास
मनोकामना पूर्ण होईल, नात्यांमध्ये सुसंवाद, आर्थिक लाभ
मिथुन रास
व्यवसायात यश, नवीन संधी, मानसिक स्थैर्य
कर्क रास
घरात मंगलकार्य, मातेसंबंधित लाभ, नोकरीत पदोन्नती
सिंह रास
राजयोग निर्माण, अधिकारी वर्गाकडून सन्मान, गुंतवणुकीत फायदा
कन्या रास
वैवाहिक जीवनात गोडवा, संततीसंबंधी शुभ बातमी
तूळ रास
आर्थिक सुबत्ता, नवीन संपत्ती मिळण्याचे योग
वृश्चिक रास
मनोबल वाढेल, शत्रूंवर विजय, अचानक लाभ
धनु रास
धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी, मन:शांती
मकर रास
घरात सुख-शांती, नोकरीत बढती, जुनी कामं पूर्ण होतील
कुंभ रास
नवीन उद्योगाची संधी, प्रवासात लाभ, नवीन मैत्री
मीन रास
रोगमुक्ती, अध्यात्मात रस वाढेल, लाभदायक निर्णय
या दिवशी कोणते उपाय करावेत?
- शिवलिंगावर जल व बेलपत्र अर्पण करा.
- ॐ नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा.
- गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष वाचा.
- मंगळ दोष असलेल्या व्यक्तींनी मंगळवारी उपवास करावा.
- कर्जमुक्तीसाठी लाल फुलं आणि 5 मोहरी शिवलिंगावर अर्पण करा.
- संकटमोचनासाठी हनुमान चालिसा वाचन अत्यंत फलदायी ठरेल.
- डॉ. भूषण ज्योतिर्विद
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















