Shiv Rajyabhishek Din 2025 Wishes In Marathi: आजचा दिवस सोन्याचा आहे. कारण अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला होता. यंदा राज्याभिषेकाचे 351 वे वर्ष पूर्ण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये मराठी साम्राज्याची मुहूर्त मेढ रोवली. त्यामुळे दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. आजच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तुम्ही कोट्स, मेसेजेस, आणि व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता...
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..!
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा…!
मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यासज्यांनी जन्म घेतला या भूमीवरतीपोवाडे, गौरव गीतांमधूनआज घुमू दे त्यांची किर्ती आसमंतीशिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सहयाद्रीच्या रांगावरती, सदा मुघलांच्या नजरा,बोटं छाटली तयांची, त्या शिवबांना माझा मुजरा..शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
झंझाविला भगव्याच्या समान तुम्ही,जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,श्री राजा शिवछत्रपती तुम्ही. !शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा..!
मराठा राजा महाराष्ट्राचाम्हणती सारे माझा – माझाआजही गौरव गिते गातीओवाळूनी पंचारतीतो फक्त “राजा शिवछत्रपती”शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,थाटला हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळाशिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..आकाशाचा रंगचं समजला नसता..जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता..शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
इतिहासालाही धडकी भरेलअसं धाडसं या मातीत घडलं,दगड-धोंड्यांच्या स्वराज्यातसुवर्णसिंहासन सजलंशिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व हार्दिक शुभेच्छा!!!
लखलखत होती शिवबांची तलवार,महाराष्ट्राला घडविणारे ते खरे शिल्पकार..!शुभ राज्याभिषेक!
उत्सव राजाचा, उत्सव स्वराज्याचा,उत्सव शिव राज्याभिषेकाचा..!शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा.
स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यासस्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आसत्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खासशिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!