Shardiya Navratri 2025 : राज्यासह देशभरात नवरात्रोत्सवाची (Shardiya Navratri 2025) धामधूम सुरु आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांचा हा उत्सव देवीच्या उपासनेसाठी केला जातो. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेळ्या रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान देवीला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. पण, देवीला तुळशीची (Basil)पाने कधीच अर्पण करत नाहीत. खरंतर, तुळस इतकी पवित्र असूनसुद्धा अशा पवित्र वेळी देवी दुर्गेला तुळस का अर्पण केली जात नाही? यामागे नेमकं कोणतं कारण आहे? या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ते जाणून घेऊयात.
देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत?
तुळशी आणि असुर संबंध
तुळशीचा विवाह शंखचूड नावाच्या दैत्याशी झाला होता. शंखचूड हा महाशक्तिशाली असुर होता. देवी दुर्गेनेच त्याचा वध केला. त्यामुळे तुळशीला दुर्गेप्रती दुःख आणि विरोध असल्याचे मानले जाते. म्हणूनच तुळशीचे पूजन दुर्गादेवीकडे मान्य नाही.
तुळशी – विष्णू प्रिया
तुळशीला भगवान विष्णूची अति प्रिय पत्नी मानले जाते. तिला “वैष्णव प्रिया” म्हणूनही ओळखले जाते. देवी दुर्गा ही शक्तीची मूर्ती आणि शैव परंपरेशी जास्त जोडली गेली आहे. तर तुळशी पूर्णपणे वैष्णव परंपरेत वापरली जाते. त्यामुळे शक्तिपूजेत तुळशी टाळली जाते.
पौराणिक मतभेद
एका पौराणिक कथेनुसार, तुळशी देवीने दुर्गामातेला शाप दिला होता की तिला कधीही आपले पूजन मान्य होणार नाही. त्यामुळे परंपरेनुसार दुर्गादेवीला तुळशी अर्पण केली जात नाही.
शास्त्रीय नियम
शक्तिपूजेत सामान्यतः अपवित्र किंवा असुराशी निगडित वस्तू अर्पण केल्या जात नाहीत. तुळशी ही असुरपत्नीकडे संबंधित असल्यामुळे ती दुर्गादेवीच्या पूजेत वर्ज्य आहे. त्यामुळे विष्णू, कृष्ण, गणेश यांना तुळशी अर्पण केली जाते, पण देवी दुर्गा, शिव, भैरव, शनी यांना तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले गेले आहे.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :
