Shardiya Navratri 2025 : शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2025) पवित्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून  नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीचे (Navratri 2025) नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. नवरात्रीच्या 9 व्या दिवशी माता दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते. दुर्गा ही शक्तीची देवी आहे. नवरात्रीच्या काळात विशेष नियम आणि शिस्त पाळली पाहिजे असे मानले जाते. 

Continues below advertisement

पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी या राक्षसाचा वध केला. त्यामुळेच मातृशक्तीची 9 दिवस उपासना केली जाते, या 9 दिवसांना नवरात्री म्हणतात. या 9 दिवसांमध्ये मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते.

नवरात्रीत 'या' 5 गोष्टी करू नका (Do Not Do These 5 Things In Navratri 2025)

नवरात्रीत विशेष नियम पाळण्यास सांगितले आहे. जे या गोष्टींची काळजी घेत नाहीत, त्यांना माता दुर्गा कठोर शिक्षा देते अशी श्रद्धा आहे. शारदीय नवरात्र हे सर्व नवरात्रींमध्ये महत्त्वाचे मानले जाते. यामध्ये ध्यानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Continues below advertisement

राग (Anger)

नवरात्रीत काहीही जालं तरीही क्रोधाला तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण, क्रोध भावनेने देवीचा आशीर्वाद घेतल्यास आपल्याला पुण्य फळ मिळत नाही अशी मान्यता आहे. शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की ज्यांना राग येतो त्यांना कधीच यश मिळत नाही. प्रत्येकाला अशा व्यक्तीपासून दूर राहायचे असते. 

अहंकार (Ego)

नवरात्रीत अहंकारापासून दूर राहा. जे उपवास करतात आणि देवी दुर्गेची विशेष पूजा करतात त्यांनी अहंकारापासून दूर राहावे. याची काळजी घेतली नाही तर दुर्गा देवीचा आशीर्वाद लाभत नाही.  

लोभ (Greed)

नवरात्रीत लोभाचा त्याग करावा. लोभामुळे सर्व प्रकारचे दोष वाढण्यास सुरुवात होते. लोभी माणूस स्वतःचा विचार करतो. जे स्वतःच्या हिताला प्राधान्य देतात, त्यांना देवी कधीच आशीर्वाद देत नाही.

खोटे बोलणे (Lying)

नवरात्रीत खोटं बोलू नका. जे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांशी खोटं बोलायला सदैव तयार असतात त्यांना देवी दुर्गा कधीच आशीर्वाद देत नाही. अशा लोकांना कधीच समाजात मान मिळत नाही.

फसवणूक (Fraud)

नवरात्रीचा सण हा दोषांवर विजय मिळवण्याचाही सण आहे. स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्यांची फसवणूक करणे अत्यंत चुकीचे आहे. जे ही सवय सोडत नाहीत त्यांना देवी दुर्गा वेळ आल्यावर कठोर शिक्षा देते. अशा लोकांवर देवीची कृपा राहत नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Horoscope Today 18 September 2025 : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना लागणार लॉटरी, दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आजचे राशीभविष्य