Shardiya Navratri 2025 : सध्या देशभरात अगदी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. अर्थात शारदीय नवरात्रोत्सव (Shardiya Navratri 2025) सुरु असल्या कारणाने देवीच्या आगमनाने भक्तिमय वातावरण आहे. त्यानुसार, उद्या शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. देवीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. असं म्हणतात की, मन एकाग्र आणि शुद्ध ठेऊन स्कंदमातेची आराधना करणाऱ्या भक्तांच्या सर्व अडचणी संपतात. स्कंदमातेची आराधना केल्याने संतानसुख मिळते.

देवी स्कंदमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय 

ज्यांना मूल होण्यात अडचणी येत आहेतस त्यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी देवी स्कंदमातेची पूजा करून तिची आरती करावी. असे म्हटले जाते की, या दिवशी काही विशेष उपाय केले तर लवकरच घरात चिमुकला पाहुणा येऊ शकतो, अशी धारणा आहे. सूर्योदयापूर्वी स्नान करून हिरवी वस्त्रे परिधान करून हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, मेहंदी, सिंदूर, चंदन, अक्षता देवीला अर्पण करावे. या दिवशी ''नन्दगोपगृहे जाता यशोदागर्भ सम्भवा. ततस्तौ नाशयिष्यामि विन्ध्याचलनिवासिनी" या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि मंत्राचा नारळ नेहमी उशीजवळ बांधून ठेवा. असे मानले जाते की यामुळे मूल होण्याचा मार्ग सुकर होतो. लवकरच संतानसुख प्राप्त होते.

देवी स्कंदमातेचे रुप

स्कंदमातेचे रूप मन मोहून टाकणारे आहे. तिला चार हात आहेत. तिने दोन हातात कमळ धारण केले आहे. भगवान स्कंद हे माता स्कंदमातेच्या कुशीत बालकाच्या रूपात विराजमान आहेत. देवी स्कंदमातेचे वाहन सिंह आहे. सिंहावर स्वार झालेली देवी दुर्गा तिच्या पाचव्या रूपात म्हणजेच स्कंदमातेच्या रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असते.

देवी स्कंदमाता पूजा विधी

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सर्व प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घराच्या मंदिरात किंवा पूजास्थळी चौकीवर स्कंदमातेचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. यानंतर गंगाजलाने शुद्ध करून कलशात पाणी घेऊन त्यात काही नाणी टाकून पदरात ठेवा. आता पूजेचे व्रत घेऊन स्कंदमातेला कुंकू-हळद लावा आणि नैवेद्य अर्पण करा. आता धूप-दीपातून आईची आरती करा आणि आरतीनंतर घरातील सर्व लोकांना प्रसाद वाटा, तुम्हीही त्याचा स्वीकार करा. स्कंदमातेला निळा रंग आवडतो, म्हणून निळे वस्त्र परिधान केलेल्या देवीला केळी अर्पण करावी. असे केल्याने आई निरोगी राहण्याचा आशीर्वाद देते.

स्कंदमाता मंत्र

नवरात्रीत केल्या जाणाऱ्या देवीच्या उपासनेमध्ये मंत्रोच्चाराचे खूप महत्त्व आहे. जाणून घ्याॐ देवी स्कन्दमातायै नमः॥

प्रार्थना मंत्र

सिंहासनगता नित्यं पद्माञ्चित करद्वया।शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥

स्कंदमातेची स्तुति

या देवी सर्वभू‍तेषु माँ स्कन्दमाता रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

उपाय

धार्मिक मान्यतेनुसार, तुमच्या घराजवळ असलेल्या कोणत्याही शक्तिपीठात किंवा देवीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा. यानंतर देवी भगवतीची 32 नावे मनोभावे वाचा. यासह देवी भगवतीच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच अपेक्षित फळ मिळेल.

देवी स्कंदमाता स्तोत्र 

नमामि स्कन्धमातास्कन्धधारिणीम्।

समग्रतत्वसागरमपारपारगहराम्॥

शिप्रभांसमुल्वलांस्फुरच्छशागशेखराम्।

ललाटरत्‍‌नभास्कराजगतप्रदीप्तभास्कराम्॥

महेन्द्रकश्यपाचतांसनत्कुमारसंस्तुताम्।

सुरासेरेन्द्रवन्दितांयथार्थनिर्मलादभुताम्॥

मुमुक्षुभिíवचिन्तितांविशेषतत्वमूचिताम्।

नानालंकारभूषितांकृगेन्द्रवाहनाग्रताम्।।

सुशुद्धतत्वातोषणांत्रिवेदमारभषणाम्।

सुधामककौपकारिणीसुरेन्द्रवैरिघातिनीम्॥

शुभांपुष्पमालिनीसुवर्णकल्पशाखिनीम्।

तमोअन्कारयामिनीशिवस्वभावकामिनीम्॥

सहस्त्रसूर्यराजिकांधनज्जयोग्रकारिकाम्।

सुशुद्धकाल कन्दलांसुभृडकृन्दमज्जुलाम्॥

प्रजायिनीप्रजावती नमामिमातरंसतीम्।

स्वकर्मधारणेगतिंहरिप्रयच्छपार्वतीम्॥

इनन्तशक्तिकान्तिदांयशोथमुक्तिदाम्।

पुन:पुनर्जगद्धितांनमाम्यहंसुराíचताम॥

जयेश्वरित्रिलाचनेप्रसीददेवि पाहिमाम्॥

हेही वाचा :           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज समयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 'या' 5 राशींच्या संपत्तीत होणार भरभराट, देवी लक्ष्मीची राहील कृपा