Shardiya Navratri 2025: पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्रौत्सवाला लवकरच सुरूवात होणार आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात या सणाला मोठे महत्त्व आहे. कारण आश्विन महिन्याची सुरूवात, शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात आणि सोबत ग्रहांचा दुर्मिळ योगायोग देखील घडणार आहे. त्यामुळे देवी दुर्गेच्या आशीर्वादाचा वर्षाव अनेकांवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शारदीय नवरात्राच्या पहिल्याच दिवशी एक दुर्मिळ योगायोग घडत आहे, ज्याचा सकारात्म परिणाम 3 राशींवर होताना दिसणार आहे.
यंदा नवरात्रौत्सव 10 दिवसांची असेल...
पंचांगानसार, 2025 वर्षात नवरात्र 22 सप्टेंबरपासून सुरू होते. यंदा नऊ वर्षांनंतर, शारदीय नवरात्र 9 ऐवजी 10 दिवस चालेल. याच्या पहिल्याच दिवशी अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहेत, त्यामुळे काही राशींना देवी दुर्गेकडून विशेष आशीर्वाद मिळतील.
शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ग्रहांचा दुर्मिळ योगायोग
ज्योतिषशास्त्रानुसार, शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शुक्ल योग, बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग, त्रिग्रही योग आणि मंगळ आणि शुक्र यांच्या युतीमुळे धनशक्ती राजयोग निर्माण होईल. नवरात्राची सुरुवात गजकेसरी राजयोगाने होते, कारण गुरू आणि चंद्र एकमेकांच्या केंद्रस्थानी असतील. परिणामी, या योगांदरम्यान देवी दुर्गेचे आगमन या 3 राशींसाठी अत्यंत शुभ राहील.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या शुभ योगायोगांचा फायदा तूळ राशींना होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. कठीण निर्णय घेणे सोपे होईल. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनातील सर्व चिंतांपासून मुक्तता मिळेल. त्यांना चालू असलेल्या आर्थिक समस्यांवर उपाय सापडतील. त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकू येईल. तुमच्या जीवनात नवीन बदल तुम्हाला आर्थिक आणि मानसिक आनंद देतील.
धनु
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा नवरात्र काळ विशेषतः फायदेशीर ठरेल. कठोर परिश्रम फळ देतील, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शिवाय, कौटुंबिक जीवन आनंद आणि शांतीने भरलेले असेल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा चौथा आठवडा कसा असणार? कोण ठरणार भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)