Shani Vakri 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 वर्ष जवळपास अर्ध संपत आलं आहे. या कालावधीत जुलै महिन्यात शनि वक्री (Shani Vakri) चालणार आहे. शनिच्या या चालीला फार महत्त्वाचं मानलं जातं. 27 जुलै 2026 रोजी शनि (Shani Dev)मीन राशीत वक्री चाल चालणार आहे. याचा परिणाम ग्रहांच्या स्थितीवरच मर्यादित नसणार आहे. तर, मानवी जीवनावरही याचा परिणाम दिसून येणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत शनि रेवती आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रात शनिला कर्मफळदाता म्हणतात. असं म्हणतात शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. जेव्हा शनी सरळ चालीपासून उलटी चाल चालतात म्हणजेच वक्री अवस्थेत येतात तेव्हा त्याचा प्रभाव फार गंभीर असतो. या काळात कोणत्या राशींना सावधानतेची गरज आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी शनिचं हे संक्रमण आर्थिक बाबतीत दबावाचं असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात अचानक अडचणी वाढतील. त्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे या काळात पैशांची अजिबात देवाण-घेवाण करु नका. पैसे गुंतवू नका. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी शनिच्या वक्रीचा हा काळ मानसिक तणावाचा असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात अनावश्यक वादविवाद वाढतील. घरात तणावाचं वातावरण निर्माण होईल. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या. 

कन्या रास (Virgo Horoscope)

शनिच्या वक्रीच्या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणावरही डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका. तसेच, वैवाहिक जीवनात देखील तणावाचं वातावरण निर्माण होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अनेक चढ-उतार जाणवतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांवर आधीपासूनच शनिची ढैय्या सुरु आहे. त्यामुळे शनिच्या वक्री अवस्थेत तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. घरात सतत चिंतेचं वातावरण निर्माण होईल. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला सतर्क राहावं लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शनिच्या वक्रीमुळे कुंभ राशीवर आर्थिक दबाव जाणवू शकतो. या काळात तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. घरात अनावश्यक वाद वाढू शकतात. तसेच, या काळात कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य