Shani Transit 2026 : शनिचं संक्रमण अवघ्या काही दिवसांवर; पुढचे 4 महिने 'या' 3 राशी असतील सुखात, शनि देणार कर्माचं फळ
Shani Transit 2026 : हिंदू पंचांगानुसार, 17 मेच्या दिवशी शनिने याच नक्षत्रात प्रवेश केला होता. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह मानला जातो.

Shani Transit 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता म्हणतात. शनिचं संक्रमण हे ज्योतिष शास्त्रात फार महत्त्वाचं मानलं जातं. जेव्हा पण शनी आपली चाल चालतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. शनिची चाल काही राशींवर (Zodiac Signs) सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम करते. सध्या शनि रेवती नक्षत्रात संक्रमण करणार आहे.
हिंदू पंचांगानुसार, 17 मेच्या दिवशी शनिने याच नक्षत्रात प्रवेश केला होता. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. या नक्षत्राचं संक्रमण 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे बुधाच्या नक्षत्रात शनिचं संक्रमण कोणकोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
कन्या रास (Virgo Horoscope)
बुध ग्रहाच्या रेवती नक्षत्रात शनिचं नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. धार्मिक कार्यात तुमचं योगदान लाभेल. तसेच, वैवाहिक जीवनात स्थिरता राहील. उत्पन्नाची अनेक साधने तुमच्यासमोर उपलब्ध होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाच्या रेवती नक्षत्रात शनिचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, करिअरच्या बाबतीत काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील. तुमच्या वाणीत गोडवा दिसून येईल. घरातील वातावरण सुख-शांतीचं असेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बुधाच्या रेवती नक्षत्रात शनिचं नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तुमची रखडलेली कामे तु्म्हाला लवकरच पूर्ण करता येतील. काही नवीन लोकांशी तुमचे संपर्क वाढतील. कुटुंबियांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Horoscope Today 7 June 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य



















