Shani Transit: ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशी अशा आहेत. ज्यांना भरपूर मेहनत करूनही यश पदरी पडत नाही, जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावेळी समजून जावे, तुमच्या पुत्रिकेत शनिचा अशुभ प्रभाव तर नाही ना..कारण वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्म आणि न्यायाचा ग्रह मानला जातो. आणि 18 ऑगस्ट 2025 रोजी न्यायाधीश शनि उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या घरात प्रवेश करेल. यामुळे काही राशींना मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे. या राशींच्या जीवनात प्रगतीचा मार्गही उघडेल. यासोबतच अनेक प्रकारच्या समस्याही सुटतील. जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत?
शनिचे नक्षत्र भ्रमण, करिअर, संपत्तीत होणार वाढ
ज्योतिषशास्त्रानुसार, 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:50 वाजता शनि मीन राशीतच उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदात प्रवेश करेल. हे संक्रमण काही राशींसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदातील संक्रमण अधिक शुभ परिणाम देईल. हे संक्रमण कठोर परिश्रम करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांचे फळ देईल आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. या काळात काही राशींना करिअर, संपत्ती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये स्थिरतेचा लाभ मिळू शकतो. उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदातील शनीचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. त्याच वेळी, काही राशींसाठी ते चांगले असेल. कोणत्या राशींसाठी हे संक्रमण चांगले राहणार आहे ते जाणून घ्या?
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर ही शनीची स्वतःची रास आहे आणि हे संक्रमण मकर राशीच्या लोकांना करिअर आणि वैयक्तिक जीवनात स्थिरता देईल. कठोर परिश्रमाचे यशात रूपांतर करण्यास मदत करेल. या काळात, तुम्ही नवीन योजना राबवू शकता, भावंडांशी संबंध सुधारतील आणि संवाद कौशल्याचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी, हे संक्रमण करिअर आणि सामाजिक जीवनात नवीन संधी आणेल. शनीचे हे संक्रमण तुमच्या ११ व्या घरावर परिणाम करेल. ज्यामुळे मित्र आणि सहकाऱ्यांसोबत सहकार्य वाढेल. उत्तरा भाद्रपदाच्या पहिल्या पदामुळे सामाजिक आदर आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. या काळात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होईल.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, या संक्रमणातून कर्क राशीच्या लोकांना आध्यात्मिक आणि भाग्याशी संबंधित फायदे मिळतील. शनि तुमच्या नवव्या भावावर प्रभाव पाडेल आणि उत्तर भाद्रपदाचा पहिला पाद तुमचे भाग्य बळकट करेल. यावेळी उच्च शिक्षण, परदेश प्रवास किंवा आध्यात्मिक कार्यात यश मिळू शकते. गुरूचा प्रभाव तुम्हाला धार्मिक आणि नैतिक मार्गावर चालण्यास प्रेरित करेल.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी, हे संक्रमण संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ करेल. शनि तुमच्या दुसऱ्या घरात असेल आणि उत्तर भाद्रपदाच्या पहिल्या पादामुळे आर्थिक निर्णय घेण्यात शहाणपण येईल. यावेळी गुंतवणूक, बचत आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये नफा होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध मजबूत होतील. गुरूच्या प्रभावामुळे तुम्हाला दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळ राशीसाठी, हे संक्रमण आरोग्य आणि आर्थिक स्थिरता सुधारेल. शत्रूंवर विजय आणि कर्जमुक्ती मिळेल. या काळात आरोग्याच्या समस्या कमी होतील आणि कठोर परिश्रमामुळे कामात यश मिळेल. गुरूच्या प्रभावामुळे तुम्हाला संयम आणि शिस्तीने आव्हानांना तोंड देण्याची शक्ती मिळेल.
हेही वाचा :
Lucky Zodiac Signs: 13 ऑगस्ट तारीख लय भारी! दत्तकृपेने 'या' 5 राशींचा वाईट काळ संपणार, गुरूचे नक्षत्र भ्रमण देणार धनलाभ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)