Shani Transit 2025: आता टेन्शन सोडा 'या' 5 राशींच्या लोकांनो! 28 एप्रिलची पहाट भाग्याची, शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने सोन्याचे दिवस येणार..
Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 28 एप्रिल रोजी सकाळी शनिदेव एक विशेष खगोलीय बदल घडवून आणणार आहेत. शनीच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार आहे.

Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा स्वामी आणि न्यायाचा देव मानला जातो, जो कर्मानुसार फळ देतो. 28 एप्रिल रोजी सकाळी 7:52 वाजता शनिदेव एक विशेष खगोलीय बदल घडवून आणणार आहेत. हा बदल तब्बल 27 वर्षांनंतर होतोय. शनीच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. जाणून घेऊया..
शनिची एक दुर्मिळ ज्योतिषीय घटना
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि तब्बल 27 वर्षांनंतर आपल्या नक्षत्र उत्तराभाद्रपदात प्रवेश करेल. 27 वर्षांनंतर शनीचे उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश होणे ही एक दुर्मिळ ज्योतिषीय घटना आहे. 28 एप्रिल 2025 रोजी शनि राहूची नक्षत्र शतभिषा सोडून त्याच्या मालकीच्या नक्षत्र उत्तराभाद्रपदात प्रवेश करेल.हा बदल काही राशींसाठी धोक्याचा इशारा देत असला तरी काही राशीच्या लोकांसाठी हा काळ यश, आनंद आणि समृद्धीची दारे उघडू शकतो. जाणून घेऊया, उत्तराभाद्रपदाची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि कोणत्या 5 राशींना या नक्षत्रातील संक्रमणामुळे भाग्य लाभणार आहे?
उत्तराभाद्रपद नक्षत्र - मोक्ष किंवा मुक्तीचे नक्षत्र
ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तराभाद्रपद नक्षत्र हे ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी 26 वे नक्षत्र आहे, जे मीन राशीच्या शेवटच्या टप्प्यात येते. या नक्षत्राचा स्वामी शनि आहे. हे मोक्ष किंवा मुक्तीचे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेले लोक ज्ञानी, विद्वान आणि धार्मिक असतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व मजबूत आणि संतुलित असते.
स्वतःच्या नक्षत्रात शनि संक्रमणाचा प्रभाव राशींवर कसा असेल?
ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणानुसार, उत्तराभाद्रपद हे शनीचे स्वतःचे नक्षत्र आहे. या नक्षत्रातील शनि संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल, परंतु विशेषत: 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. जाणून घेऊया शनीचे हे संक्रमण कोणत्या राशीसाठी वरदान ठरेल?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक अर्थाने फायदेशीर राहील. शनीचे स्वतःच्या नक्षत्रात होणारे संक्रमण तुम्हाला करिअरमध्ये स्थिरता देईल. जर तुम्ही तुमच्या नोकरीवर दीर्घकाळ असमाधानी असाल किंवा बदल शोधत असाल तर ही वेळ नवीन शक्यतांची दारे उघडू शकते. व्यवसायात नवीन योजना आखल्या जातील आणि त्या यशस्वीही होतील. परदेशात जाण्याचा किंवा उच्च शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी आता रखडलेल्या व्यवसायाला गती मिळेल. जर तुम्ही आधी कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल आणि त्याचे फायदे मिळत नसतील तर आता त्याचे फळ मिळण्याची शक्यता आहे. शनीचे हे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य आणणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठीही काळ शुभ राहील. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचा हा बदल करिअरच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरेल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात आणि जुन्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा प्रशंसा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामात स्थिरता आणि समाधान मिळेल. जे लोक दीर्घकाळ मानसिक तणावातून किंवा गोंधळात जात होते त्यांना आता आराम मिळणार आहे. आत्मविश्वास वाढेल.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर ही शनीची स्वतःची राशी आहे आणि जेव्हा शनि स्वतःच्या राशीत येतो तेव्हा त्याचा खोल प्रभाव येथे दिसून येतो. यावेळी, तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि बॉसचे पूर्ण सहकार्य मिळेल. ज्यांना नवीन प्रकल्पात हात घालायचा आहे त्यांच्यासाठी वेळ अनुकूल आहे. पात्र लोकांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव मिळू शकतात. मानसिक ताण कमी होईल आणि कौटुंबिक जीवनही आनंदी राहील.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ यशाने परिपूर्ण असेल. नशीब तुमच्या बाजूने राहील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या कामातून फायदे होतील, विशेषत: जर तुम्ही आधी भागीदारीत काम केले असेल तर आता तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. कौटुंबिक नात्यात मधुरता वाढेल, आरोग्यही सुधारेल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















