Budh-Surya Yuti : बुध मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. 27 फेब्रुवारी 2023, सोमवार, कुंभ राशीत बुधाचे राशी परिवर्तन सर्व राशींवर परिणाम करेल. बुध 27 फेब्रुवारी 2023 रोजी 4 वाजून 33 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. 15 मार्चपर्यंत बुध ग्रह कुंभ राशीत राहील. मकर राशीप्रमाणे कुंभ राशी देखील शनिची राशी आहे. या राशीमध्ये बुध असल्यामुळे अनेक लोकांच्या आर्थिक स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.


अनेक राशींवर मोठा प्रभाव पडेल


सूर्य देवाने कुंभ राशीत प्रवेश केला असून त्याची शनिशी युती आहे. तसेच बुध सुद्धा 27 फेब्रुवारीला या कुंभ राशीत प्रवेश करेल. 16 मार्चपर्यंत बुध या राशीत राहणार आहे, त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करेल, जिथे त्याचा गुरूशी संयोग होईल. 15 मार्चपर्यंत सूर्यही कुंभ राशीत राहणार आहे, अशा स्थितीत 27 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शनीचा संयोग होईल, ज्याचा अनेक राशींवर मोठा प्रभाव पडेल.



सूर्य आणि बुध यांच्या युतीचा परिणाम


-रवि आणि बुध यांच्या संयोगामुळे लोकांना व्यवहार आणि गुंतवणुकीत नुकसान सहन करावे लागू शकते.
-लोकांमध्ये परस्पर वादही होऊ शकतात.
-काही लोकांच्या आर्थिक व्यवहारातही अडथळे येऊ शकतात.
-सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे या ग्रहाचा खरेदी-विक्री, व्यवहार, गुंतवणूक, वाणी, अभिव्यक्ती, हिशोब आणि बुद्धिमत्तेवर प्रभाव पडतो.
-पत्रकार, व्यवसाय आणि शेअर बाजाराशी संबंधित लोकांना बुधाच्या राशी बदलाचा जास्त फटका बसतो.


 


बुध 15 मार्च 2023 पर्यंत कुंभ राशीत राहील


बुध 15 मार्च 2023 पर्यंत कुंभ राशीत राहील आणि नंतर कुंभ राशीतून बाहेर पडल्यानंतर मीन राशीत प्रवेश करेल. जेव्हा बुध 27 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करेल, त्या वेळी शनि 5 अंशांवर असेल आणि सूर्य 14 अंशांवर असेल. या कारणास्तव, 4 दिवसांच्या आत बुध आणि शनीचा संयोग होईल, जो जवळच्या अंशात असेल. सूर्य देखील या राशीमध्ये स्थित असेल, परंतु बुध ग्रहाच्या सर्वात जवळ असल्यामुळे मार्चमध्ये तो या राशीतून बाहेर पडेल.


 


बुध हा चंद्र आणि तारा यांचा पुत्र 
बुध हा संवादाचा ग्रह आहे. भगवान विष्णू हे बुध ग्रहाचे प्रमुख देवता आहेत, बुध हा व्यवसायाचा देव आणि व्यापाऱ्यांचा रक्षक आहे. बुध हा चंद्र आणि तारा यांचा पुत्र आहे. बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. बुधाच्या हातात तलवार, ढाल, गदा आणि वरमुद्रा आहेत.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Weekly Horoscope 27 February to 5 March 2023 : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 'या' भाग्यशाली राशी असतील, देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद! साप्ताहिक राशीभविष्य