Shani-Surya Powerful Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, 14 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्याने (Sun) आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत संक्रमण केलं. या संक्रमणानंतर शनी (Shani dev) आणि सूर्य हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या 30 डिग्री अॅंगलवर आले आहेत. त्यामुळे सूर्य आणि शनी द्वी-द्वादश राजयोग निर्माण झाला आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि शनीचा दुर्लभ राजयोग 15 मे पर्यंत तीन राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. या शुभ राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनी-सूर्याच्या युतीमुळे जुळून येणारा दुर्लभ राजयोग मिथुन राशीच्या लोकांच्या धनधान्य संपत्तीत चांगली वाढ निर्माण करणारा आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, या काळात तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. तुमच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तसेच, तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल. तसेच, तुमचं आरोग्य सुधारेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनी-सूर्याच्या शक्तिशाली आणि दुर्लभ राजयोगाने कर्क राशीच्या लोकांची चांगली प्रगती दिसून येईल. नोकरदार वर्गातील लोकांच्या पगारात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाईल. तसेच, या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, आर्थिकदृष्ट्या तुमची चांगली प्रगती दिसून येईल. करिअरच्या मोठ्या पदावर तुम्ही असाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बिझनेस करणाऱ्या लोकांना या काळात उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. चारचौघांत तुमच्या कामाचं चांगलं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमचं आरोग्यदेखील चांगलं असणार आहे. मित्रांचा चांगला सहवास तुम्हाला लाभेल. तसेच, नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, व्यवसायात चांगली वाढ झालेली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :