Shani Sade Sati: शनि साडेसाती...ज्याचा उल्लेख होताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण शनि साडेसाती म्हणजे लोकांच्या आयुष्यात मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागतो, असा सर्वसामान्य समज आहे. शनिची साडेसाती सुरू झाली की अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात. कोणते रत्न घालावे, कोणत्या धातूचा वापर करावा, कोणते दान करावे याबरोबरच साडेसातीच्या काळात सोनं घालावं की टाळावं? हा प्रश्नही अनेकांकडून विचारला जातो. ज्योतिषशास्त्रात याबाबत काय म्हटलंय? जाणून घेऊया...

Continues below advertisement

शनि साडेसाती आणि सोनं घालण्याचा संबंध काय? (Shani Sade Sati)

ज्योतिषशास्त्रात सोन्याचा संबंध सूर्य ग्रहाशी जोडला जातो. सूर्य हा आत्मविश्वास, मान-सन्मान, नेतृत्व, अधिकार आणि व्यक्तिमत्त्वाचा कारक मानला जातो. दुसरीकडे शनि हा कर्म, शिस्त, परिश्रम, जबाबदारी, विलंब आणि न्यायाचा कारक मानला जातो. सूर्य आणि शनि यांच्यात मोठे वैर असल्याचे पारंपरिक ज्योतिषशास्त्रात मानले जाते. त्यामुळे काही ज्योतिषी साडेसातीच्या काळात सोन्याचा अतिरेक टाळण्याचा सल्ला देतात. 

सोन्याचा संबंध सूर्याशी, शनि-सूर्यात मोठं वैर - ज्योतिषशास्त्र

ज्योतिषींच्या मते, सोन्याला सूर्य ग्रहाशी जोडले जात असल्याने आणि शनिला सूर्याचा विरोधी ग्रह मानले जात असल्याने याबाबत संभ्रम अधिक असतो. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार केवळ साडेसाती सुरू आहे म्हणून सोनं घालणं पूर्णपणे अयोग्य आहे, असा कोणताही सार्वत्रिक नियम नाही. मात्र साडेसाती म्हणजे सोनं निषिद्ध, असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये सूर्य शुभ आणि बळकट स्थितीत असेल, तर सोनं धारण करणं सकारात्मक मानलं जाऊ शकतं. उलट सूर्य अशुभ स्थितीत असेल किंवा त्याचा संबंध विशिष्ट अशुभ योगांशी असेल, तर सोनं वापरण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

Continues below advertisement

शनिच्या साडेसातीदरम्यान 'हे' धातू परिधान करा

ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला शनिची साडेसातीचा प्रभाव कमी करायचा असेल, तर तुमच्या करंगळीत लोखंडी अंगठी घालणे शुभ असू शकते. लोखंड शनीचा प्रभाव कमी करू शकते. याव्यतिरिक्त, चांदीचे दागिने घातल्याने मन शांत होण्यास मदत होते, कारण चांदीला चंद्राचा धातू मानले जाते आणि ते साडेसातीचा प्रभाव कमी करण्यास मदत करू शकते. शनिच्या साडेसातीदरम्यान सोन्याच्या वस्तू परिधान करणे शुभ मानले जात नाही. तुम्हाला हे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

सोनं कोणासाठी लाभदायक? कुंडलीचा अभ्यास महत्त्वाचा

ज्योतिषशास्त्रानुसार शनि व्यक्तीला शिस्त, जबाबदारी, संयम आणि कर्माचे महत्त्व शिकवतो. त्यामुळे साडेसातीच्या काळात भीती न बाळगता योग्य कर्म, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशात, सोनं धारण करायचं की नाही, हे ठरवताना केवळ साडेसाती पाहिली जात नाही. जन्मलग्न, चंद्रराशी, सूर्याची स्थिती, शनिचे स्थान, ग्रहांचे परस्पर संबंध तसेच महादशा-अंतर्दशा यांचा विचार केला जातो. त्यामुळे एका व्यक्तीला सोनं लाभदायक ठरू शकतं, तर दुसऱ्या व्यक्तीला ते टाळण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. दरम्यान, साडेसातीचा काळ म्हणजे नेहमीच संकटांचा काळ असतो, अशी समजूतही योग्य नाही.

ज्योतिषशास्त्रात सरसकट नियम नाही...

‘साडेसाती सुरू आहे, त्यामुळे सोनं घालू नका’ असा सरसकट नियम ज्योतिषशास्त्रात नाही. सोनं घालणं योग्य आहे की नाही, याचा निर्णय वैयक्तिक जन्मकुंडलीच्या आधारे घेणे अधिक योग्य मानले जाते. त्यामुळे केवळ साडेसातीच्या भीतीने सोन्याचे दागिने काढून ठेवण्यापेक्षा जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन निर्णय घेणे योग्य ठरेल.

हेही वाचा :

Hindu Religion: कुलदेवता, ग्रामदेवता की इष्टदेवता? पूजा आधी कोणाची करावी? पूजेचा योग्य क्रम कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)