Shani Sade Sati: शनिदेवांच्या नावाचा केवळ उल्लेख जरी झाला तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. जेव्हा शनि देव एखाद्या राशीवर आपली दृष्टी टाकतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या संयम, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाची कठोर परीक्षा घेतली जाते. असा अनेकांचा समज आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, शनिदेवांना न्यायाची देवता आणि कर्माचे फळ देणारा मानले जाते. शनिच्या लहानतल्या लहान हालचालींचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शनि सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे. ज्याचा परिणाम 12 राशींवर तर होतच आहे. मात्र अशी एक रास आहे, जिच्यावर शनि साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू आहे. या राशीसाठी हा काळ संयम, शिस्त आणि समजूतदारपणाने पुढे जाण्याचा काळ आहे. जाणून घेऊया, कोणती आहे ती रास? जिच्यावर 2027 वर्षात शनि साडेसातीचा सर्वात कठीण आणि संयमाची परीक्षा असेल...

Continues below advertisement

साडेसातीचा अंतिम टप्पा 'या' राशीवर, 2027 पर्यंत सावधान! (Shani Sade Sati)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीसाठी साडेसातीचा अंतिम टप्पा जून 2027 रोजी सुरू होईल, ज्यावेळी शनि मेष राशीत प्रवेश करेल. यावेळी, मीन राशीसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा आणि मेष राशीसाठी पहिला टप्पा सुरू होईल. बरेच जण अंतिम टप्प्याला आरामाचा काळ मानतात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, या काळातही सावधगिरी आणि संयम राखणे महत्त्वाचे आहे. कुंभ राशीसाठी, जून 2027 पासूनचा काळ हा संयम, शिस्त आणि समजूतदारपणाने पुढे जाण्याचा काळ आहे. या काळात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते पाहूया.

2027 पर्यंत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीसाठी शनिच्या साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू आहे. ग्रहस्थितीनुसार, कुंभ राशीच्या व्यक्तींनी 3 जून 2027 पर्यंत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात झालेली एक छोटीशी चूक किंवा घाई मोठे नुकसान करू शकते. जाणून घेऊया की कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात कोणत्या चुका टाळाव्यात? शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय योजावेत.

Continues below advertisement

काय लक्षात ठेवावे?

ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात काळजीपूर्वक विचार केल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. कोणत्याही कामात घाई केल्यास नुकसान होऊ शकते. गुंतवणूक, नोकरीतील बदल, भागीदारी किंवा मोठे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी संयम ठेवा आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणे टाळा. शनी हा शिस्त आणि कृतीचा देव आहे, त्यामुळे आपले काम पूर्ण प्रामाणिकपणाने आणि जबाबदारीने करणे फायदेशीर मानले जाते.

'या' गोष्टींपासून दूर राहा..

ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात फसवणूक, कपट किंवा अन्याय टाळा. खोटे बोलणे, अयोग्य मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणे किंवा गरजूंचा अपमान करणे हे शनीच्या दृष्टीने प्रतिकूल मानले जाते. अनावश्यक वाद, राग आणि अहंकार यांपासून दूर राहा. तसेच दुसऱ्याच्या कष्टाचे श्रेय घेणे किंवा इतरांना इजा पोहोचवणे टाळावे.

साडेसातीच्या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय

धार्मिक श्रद्धेनुसार, शनिवारी योग्य विधींनी शनिदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावता येतो. 'ओम शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करणे देखील लाभदायक मानले जाते. आपल्या क्षमतेनुसार काळे तीळ, उडीद डाळ, मोहरीचे तेल, काळे वस्त्र किंवा लोखंडी वस्तू दान करणे देखील शुभ मानले जाते. याव्यतिरिक्त, गरजूंना मदत करणे, वृद्धांचा आदर करणे, प्राणी आणि पक्ष्यांना खाऊ घालणे आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे हे देखील शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्याचे सोपे मार्ग मानले जातात.

साडेसाती नेहमीच अशुभ असते का?

साडेसातीचे नाव काढताच लोक अनेकदा घाबरतात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीमुळे प्रत्येकावर केवळ संकटेच येतात असे नाही. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असेल आणि ती व्यक्ती शिस्तबद्ध जीवन जगत असेल व चांगली कर्मे करत असेल, तर साडेसातीच्या काळातही त्यांना करिअर, आर्थिक सुबत्ता आणि जीवनातील संधींमध्ये सकारात्मक अनुभव येऊ शकतो. त्यामुळे, या काळात भीती बाळगण्याऐवजी संयम, कठोर परिश्रम आणि सदाचारावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते.

हेही वाचा :

Astrology: देव, मनुष्य की राक्षस गण? गण म्हणजे नेमकं काय? तुमचा गण कसा ओळखाल? व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध काय? ज्योतिषशास्त्र...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा कवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)