Shani Sade Sati 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि देवाला (Shani Dev)कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. शनिदेव फार हळुवार गतीने चालतात. शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनि देव जेव्हा एका राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याच्या बरोबर त्याच्या पुढच्या आणि मागच्या राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव राहतो.
सध्या 2026 या वर्षात कुंभ, मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव चालू आहे. अशा वेळी या तीन राशींच्या जीवनावर शनिच्या साडेसातीचा प्रभाव नेमका कधीपर्यंत असणार आहे हे जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे या राशीवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव जास्त दिसून येतो. या काळात तुम्हाला मानसिक तणाव, विनाकारण धावपळ, कामात अडचणी आणि अचानक खर्चात वाढ होऊ शकते. अशा वेळी कोणत्याही कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडू नका. संयम आणि धैर्याने काम करा.
या राशीच्या लोकांवर मे 2032 पर्यंत शनिच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु आहे. या काळात तुम्हाला इतरांच्या तुलनेत जरा कमी त्रास मिळेल. तसेच, तुमचा मानसिक ताण हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या रखडलेल्या कामांना चांगली गती मिळेल. आरोग्याच्या बाबतीत कोणताच निष्काळजीपणा करु नका. तसेच, खर्चावर नियंत्रण ठेवा.
या राशीच्या लोकांना जून 2027 पर्यंत शनिच्या साडेसातीपासून सुटका मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा आणि सर्वात कठीण टप्पा सुरु आहे. दुसरा टप्पा हा सर्वात जास्त प्रभावी असतो. त्यामुळे तुम्हाला या काळात करिअरमध्ये अनेक संघर्ष, कामावर दबाव, कुटुंबात मतभेद तसेच, आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. या काळात कोणावरही डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका.
मीन राशीच्या लोकांना ऑगस्ट 2029 पर्यंत शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
