Shani Sade Sati 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि (Shani Dev)सध्या मीन राशीत विराजमान आहे. तर, कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर सध्या शनिची साडेसाती सुरु आहे. कर्क रास चंद्राच्या राशीत जाणार आहे. तर, गुरु उच्च राशीत आहे. शनिचा उच्च राशीत होणारा प्रवेश फार शुभ मानला जातो. 

Continues below advertisement

या ठिकाणी आपण शनिची साडेसाती सुरु असणाऱ्या लोकांवर गुरु ग्रहाच्या संक्रमणाचा प्रभाव नेमका कसा होतो ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या चौथ्या चरणात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. नवीन वाहनाची खरेदी तुम्ही करु शकता. तसेच, या राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. पैशांचा जपून वापर करा. 

Continues below advertisement

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. मात्र, इतर गोष्टीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. तुम्हाला दिर्घकालीन आजाराचा सामना करावा लागू शकतो. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यामुळे या राशीसाठी गुरु ग्रहाचं संक्रमण शुभकारक ठरणार आहे. शनिची साडेसाती सुरु असल्या कारणाने इतके दिवस ज्या समस्या तुम्हाला जाणवत होत्या त्या हळुहळू कमी होतील. या कालावधीत तुम्ही एखाद्या नवीन वाहनाची खरेदी करु शकता. 

हे ही वाचा :                                                                                                                   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...