Shani Pradosh Vrat 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 24 मे रोजी मे महिन्यातला सर्वात शेवटचा शनि प्रदोष व्रत (Shani Pradosh) आहे. तसेच, आज शनिदेवाचा वारदेखील आहे त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या दिवशी काही उपाय केल्याने शनीच्या ढैय्या आणि साडेसातीपासून सुटका मिळेल.
शनी देव तिथी आणि शुभ मुहूर्त
आज शनि प्रदोष व्रत आहे. या दिवशी त्रयोदशी तिथी आणि शनिवारचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार शुभ आहे. तसेच, आजच्या दिवशी भगवान शंकर आणि शनिदेवाची पूजा केल्याने तुम्हाला चांगलं फळ मिळेल. आजच्या दिवशी ज्या लोकांनी उपवास केला आहे त्यांनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. तसेच, संध्याकाळच्या वेळी शनी मंदिरात जाऊन पूजा करावी.
'हे' उपाय करा
पिंपळाच्या झाडाची पूजा करा
सकाळच्या वेळी काळे तिळाच्या पाण्याने पिंपळाच्या झाडाला जल चढवा. तसेच, धूप आणि दिवा लावा. पिंपळाच्या झाडाला 11 वेळा परिक्रमा करा. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाला दिवा लावा. हा उपाय केल्याने शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
गरजूंना दान करा
शनि प्रदोष व्रताच्या दिवशी श्वान, कावळा आणि काळ्या गायीला चपाती खाू घाला. या व्यतिरिक्त सहकाऱ्यांची, गरजूंची महत करा. फक्त पैसे नाही तर उपयोगी सामान दान करा. जसे की, कपडे, चपला आणि अन्नदान करा. यामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील.
'या' वस्तूंचं दान करा
शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काही खास वस्तूंचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. काळे तीळ, उडीद डाळ, लोखंडाच्या वस्तू, मोहरीचं तेल आणि काळ्या कपड्यांचं दान करा. या शिवाय भगवान शंकर आणि भगवान हनुमानाची पूजा करा. संपूर्ण दिवस व्रत ठेवा. तसेच, आजच्या दिवशी फक्त फलाहार आणि जल ग्रहण करा. या सगळ्यांपासून तुम्हाला शनि दोषांपासून सुटका मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :